September 20, 2021
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड मधील त्रिमूर्तींचे त्रिगुणात्मक योगदान

चिंचवड प्रतिनिधी : PCNews

भाग्यवह कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे, आणि यामुळे हातावर पोट असलेले व रस्त्यावर वास्तव्यास असलेले भीक मागणारे गोर गरीब यांचे अतोनात हाल सुरू आहेत.
अशावेळी समाजमन जागृत असलेले अनेक जण आपले सामाजिक कर्तव्य या जनिवेने या गोरगरिबांच्या मदतीला धावून आले.

पिंपरी चिंचवड मध्ये अनेकांनी गरीब कष्टकरी, भिकारी सर्वांसाठी आपला मदतीचा हात देण्यास सुरुवात केली
चिंचवडगावतील तीन मित्र अशाच रीतीने त्रिमूर्ती बनून या गोरगरिबांसाठी त्रिगुणात्मक योगदान देऊ लागले आहेत

भूषण नवाळे, मयूर देव, किरण साठे या तिघा मित्रांनी २८ मार्च पासूनच लॉकडाऊन मध्ये अडचणीत असलेल्या गोरगरिबांना मदत करण्यास सुरुवात केली.
आजतागायत त्यांचे हे योगदान अखंडपणे सूरु आहे व त्यांच्या या कार्यास आता अनेक संस्थेनकडून मदत देखील मिळायला सुरू झाली आहे.
प्रामुख्याने शहरात रस्त्यावर असलेल्या भिकाऱ्यांसाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था करून देण्यास सुरुवाट केली आहे

मोरया गोसावी मंदिर, चाफेकर चौक, डांगे चौक, काळेवाडी, मुंबई पुणे रस्ता, खेळणी विकणारी राजस्थानी कुटुंब, आकुर्डी चौक, दळवी नगर या ठिकाणच्या गोरगरीबांची जेवणाची व्यवस्था ते दररोज करत आहेत

त्याचबरोबर वाल्हेकरवाडी, चिंचवड, वेताळनगर, आदी परिसरात जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटे त्यांनी गरजूंना दिले आहेत

कोरोनाच्या पर्शवभूमीवर जागृततेने प्रत्येक चौकात चेक पोस्ट वर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या त्रिमूर्तींनी बिस्कीट वाटली आहेत

गोरगरिबांसाठी जणू देवदूतच ठरलेल्या या त्रिमूर्तींना लक्ष्मी विनायक प्रतिष्ठाण, सोबतच इम्रान पानसरे, आनंद काळभोर, संतोष तोडकर, आशिष खाडे, महेश देव, उमेश जगताप, रवी बम्मा, भागवत काका, सुजित देशपांडे, योगेश कुलकर्णी यांनी आपले योगदान देऊन यांच्या कार्याला हातभार लावला

एवढंच नव्हे तर सौ. स्वरूपा राघवेंद्र देशपांडे यांनी जवळपास १००० मास्क विणामुल्य शिवून देण्याचे मान्य केले असून, त्यांनी जवळपास ५०० मास्क २ दिवसाच्या कालावधीत शिवून देखील दिले आहेत.
नवाळे म्हणाले, “मास्क शिवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आम्ही सौ. देशपांडे यांना सुपूर्त केले आहेत, व आमच्या या मोहिमेत त्यांचे योगदान खरंच कौतुकस्पद आहे”.

आपण देखील गरजू आणि गोरगरिबांना मदतीचा एक हात पुढे करून या त्रिमूर्तीच्या योगदानाला बळकट करू शकता, कारण संकटात असलेल्यांची संख्या जास्त आहे व त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त प्रमाणात साहित्य सामग्री आवश्यक आहे.

आपले योगदान देण्यासाठी आपण यांना संपर्क करू शकता
भूषण नवाळे : 9145106781

Related posts

शहरातील वाईन शॉप उघडल्यामुळे कोरोना वाढला असता का ?

PC News

आकुर्डी जय गणेश व्हीजन परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट

PC News

न्यूजपेपर मध्ये खाद्यपदार्थ घेण्यास टाळावे, आरोग्यास होऊ शकते हानी

PC News

राहण्यासाठी रावेत पेक्षा वाकड बरे – नागरिकांची प्रतिक्रिया

PC News

कोरेगाव तालुका भाजप महिला अध्यक्ष पदी हेमलता पोरे यांची बिनविरोध निवड, खा.छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी केले अभिनंदन!!!

PC News

मद्यप्रेमींसाठी खुशखबर

PC News

एक टिप्पणी द्या