September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

युनिव्हर्सिटी चौकातील पूल होणार जमीनदोस्त?

पुणे : प्रतिनिधी PC News
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य सरकारचे नियोजन बैठकीस सुरूवात झाली आहे.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्ग शिवाजीनगर पासून हिंजवडी पर्यंत असणार आहे. तर या मार्गात एसपीपीयु पूल म्हणजेच युनिव्हर्सिटी चौकातील पाषाण, बाणेर आणि औंधला जोडणारा हा पुल अडचण म्हणून मेट्रोच्या मार्गात उभा आहे.
या पूर्वी जानेवारी 2019 मध्ये झालेल्या बैठकीत पीएमारडीए च्या अधिकाऱ्यांनी पूल पाडणे या पर्यायाला पसंती दिली न्हवती व तो शेवटचा पर्याय असेल असे स्पष्ट केले होते, मात्र सध्याच्या नवीन टेक्निकल रिपोर्ट प्रमाणे, मेट्रो प्रोजेक्टवर काम करीत असलेले प्रायव्हेट फर्मचे अधिकारी म्हणाले की पूल पाडल्याशिवाय मेट्रोचे काम सुरू करता येऊ शकत नाही.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी या विषयी शनिवारी 25 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सर्व मेट्रो प्रोजेक्ट वर काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांचे मुद्दे ऐकून घेतले, या वेळी पुण्यातील सर्व आमदार देखील या बैठकीत सामील होते.

अजित पवारांनी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पीएमआरडीए ला एसपिपीयू पूल पाडण्याविषयीचा रिपोर्ट प्रस्तुत करण्यास सांगितले आहे, व ते इतर सल्लागारांशी या विषयावर चर्चा करून यावर काय निर्णय घ्यावा हे स्पष्ट करू शकतील.
या वेळी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की मेट्रो प्रोजेक्ट मार्गी लागण्याविषयी आमची चर्चा सकारात्मक झाली, परंतु राज्य सरकारने पूल पाडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी इतर पर्यायांचे अन्वेषण करायला हवे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनीही या विषयी आपले मत मांडत स्पष्ट केले की जुने पूल पाडून नवीन पूल बांधल्याने प्रोजेक्टचा खर्च वाढू शकतो, तरी प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी २-३ वर्ष लागणार आणि या मुळे वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होईल व ट्राफिक पोलिसांना अनेक मार्गांचे फेरफार करावे लागतील.

त्यामुळे मेट्रोसाठी काही पर्यायी मार्ग नसल्यास शेवटी एस पी पी यु पूल हे तोडावे लागु शकते

Related posts

पुण्यातील गोल्डमॅन सचिन शिंदे यांची गोळ्या झाडून हत्या

PC News

पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शरीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे “ गाथा महाराष्ट्राच्या ऑलिंपिक वीरांची” या कार्यक्रमाचे आयोजन, केशव अरगडे यांची क्रीडा समितीमध्ये निवड

PC News

पंकज बगाडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार आघाडी हवेली तालुका अध्यक्षपदी निवड

PC News

आमदार अण्णा बनसोडेंच्या पाठपुराव्याला यश, पिंपरी चिंचवड मनापा कर्मचार्यांना ७ वा वेतन लागू – आयुक्तांची मान्यता

PC News

बनावट फेसबुक अकाऊंट बनवून सम्राट मोजे यांची बदनामी

PC News

रायगडावर डिस्कोथेक सारखे वातावरण तयार करणे अपमानजनक : छत्रपती संभाजीराजे

PC News

एक टिप्पणी द्या