September 20, 2021
इतर जीवनशैली पिंपरी चिंचवड

सोशल डिस्टन्सिंग पाळून सांगवीत विवाह सोहळा संपन्न

पिंपरी : दिनांक २ मे २०२०: कोरोना संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे सांगवीतील सामाजिक कार्यकर्ते महेश भागवत यांचे चिरंजीव ओंकार भागवत याचा चि.वैष्णवी बापूराव डरांगे हिच्याशी ठरलेला विवाह सोहळा अखेर घरातल्या घरात साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन,अगदी मोजक्या दहा जणांच्या उपस्थितीत,सर्वांनी मास्क घालून व सामाजिक अंतर राखत हा विवाह सोहळा सांगवीतील भागवत यांच्या घरी संपन्न झाला.
विशेष बाब म्हणजे सामाजिक दायित्वाचे भान राखत साधेपणाने केलेल्या या विवाहामुळे जो खर्च वाचला त्याबद्दल मुख्यमंत्री सहाय्यता निधी व प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी २५,००० असे एकूण ५०,००० रुपयांच्या मदतीचा धनादेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे यांच्याकडे नवदांपत्याकडून सुपूर्द करण्यात आला.
त्यांच्या या सामाजिक जाणीवेबद्दल महापौरांनी कौतुक करत नवदांपत्याला आशिर्वाद दिले.

#PCNews #PimpriChinchwad #PCMC #Pune

Related posts

पिंपरी : डॉक्टरांनी आस सोडली मात्र आत्मविश्वासाने कोरोनावर केली मात

PC News

आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराचे सुशोभीकरण लवकर करावे,फेहमीदा जावेद शेख यांची महापालिकेकडे मागणी

PC News

रहाटणी फाट्यावर ड्रेनेज चेंबर बनले वाहन चालकांसाठी धोकादायक!!!!

PC News

लग्नाचे वचन देऊन शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार नाही – दिल्ली उच्च न्यायालय

PC News

शहरातील वाईन शॉप उघडल्यामुळे कोरोना वाढला असता का ?

PC News

सीबील स्कोर (Cibil Score) सुधारण्यासाठी करा हा उपाय !

PC News

एक टिप्पणी द्या