July 26, 2021
महाराष्ट्र

टुरिस्ट व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी – महाराष्ट्र वाहतुक सेनेचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

प्रतिनिधी : लोणावळा

पर्यटनावर अवलंबून असलेली लोणावळा शहराची अर्थव्यवस्था ढासळली असल्याने येथील टुरिस्ट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटातून टुरिस्ट व्यावसायिकांना सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

लोणावळा व ग्रामीण भागातील अनेक मध्यमवर्गीय तरुणांनी बँकांची कर्जे काढत टुरिस्ट व्यवसायाकरिता वाहने खरेदी केली आहे. लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची ने आण करून ही मंडळी कुटुंबाची उपजीविका करतात, कोरोनामुळे राज्यभरातील सर्व पर्यटन व्यवसाय बंद पडला आहे. लॉकडाऊनमुळे लोणावळा शहरात पर्यटक येत नसल्याने टुरिस्ट व्यवसाय धोक्यात आला आहे. या संकटातून मध्यमवर्गीय तरुणांना व त्यांच्या कुटुंबाला सावरण्याकरिता महाराष्ट्र शासनाने लोणावळ्यातील टुरिस्ट व्यवसायिकांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केदारी यांनी निवेदनात केली आहे.

Related posts

अमित मेश्राम मित्र परिवाराचे दररोज मोफत अन्नदान

PC News

पुणे: कोंढवा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

PC News

विप्रो कडून  पुण्यात हिंजवडी येथे  विशेष कोविड रुग्णालयाची उभारण

PC News

आषाढी एकादशी ऑनलाईन साजरी

PC News

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अमित मेश्राम यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी, निगडी पोलिसात गुन्हा दाखल,आरोपी सोलापूरचा!!!

PC News

टोमॅटो मध्ये तिरंगा व्हायरस असल्याची खबर

PC News

एक टिप्पणी द्या