September 20, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड

YCM रुग्णालयास आमदार अण्णा बनसोडे यांची भेट – परिचारिकांचे केले अभिनंदन

YCM रुग्णालयास आमदार अण्णा बनसोडे यांची भेट – परिचारिकांचे केले अभिनंद

पिंपरी: ( पी.सी.न्यूज )

पिंपरी – चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास आज आमदार अण्णा वनसोडे यांनी आज परिचारिका दिना निमित्ताने भेट दिली आणि परिचारिकांचे प्रश्न समजून घेतले. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाबळे, मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, रुग्णालयाच्या अधिसेविका व मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होत्या. परिचारिकांनी काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढाच आमदारांसमोर मांडला असता, आमदार बनसोडे यांनी रुग्णालयाची सुरक्षा, कर्मचार्यांना संरक्षण, वेतन वाढ, पदोन्नती आदी प्रश्ना सोडविण्यासाठी तातडीने मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. कोविड 19 वार्ड मध्ये काम करणाऱ्या परिचारिकांशी चर्चा केली व त्यांचे मनोबल वाढविले. यापूर्वी आमदार बनसोडे यांनी या कोरोना रुग्णालयातील कक्षात काम करणाऱ्यासाठी आमदार निधीमधून शहरातील YCM रुग्णालयास ४५ लाख व जिल्हा रुग्णालयास ५ लाख रुपये निधी PPE कीट खरेदी करण्यासाठी दिलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनासाठी आवश्यक निधी कमी पडणार नाही परंतू कोरोना साथीच्या वेळी होणाऱ्या खर्चामध्ये भ्रष्टाचार झाल्यास कोणत्याही आणि कितीही उच्च पदस्त अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. YCM च्या भेटी नंतर आमदार बनसोडे यांनी तत्काळ मनपा आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन YCM रुग्णालयातील प्रश्नाबाबत चर्चा केली, यावेळी झालेल्या चर्चेत रुग्णालयाची सुरक्षा वाढवणे, कंत्राटी कर्मचारीवर्गास धोकादायक काम करीत असल्याने वाढीव भत्ता तसेच कोरोना कक्षात काम करीत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गास क्वारंटाइन रजा देण्यात बाबत आयुक्त सकारात्मक कार्यवाही करणार असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कोरोना रुग्णावर उपचार CCTV अंतर्गत करण्यात यावे – भारतीय राष्ट्रवादी पार्टीची मागणी

PC News

अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा लोकार्पण

PC News

उर्वरित भागातील ‘सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू करा – ‘आप’ युवा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

PC News

पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे मिनरल वॉटर नव्हे !

PC News

महाविकास आघाडी सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले – पिंपरी-चिंचवड भाजपकडून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध

PC News

(कोव्हिड१९) लहान मुलांच्या सुरक्षेसाठी भाजप महिला मोर्चाचे डिजिटल मार्गदर्शन:उज्वला गावडे

PC News

एक टिप्पणी द्या