September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा’ – आप युवा आघाडीची मागणी

प्रतिनिधी : (१५ मे) PCNews

राज्य सरकारने रातोरात आपला निर्णय बदलून मोफत एस टी बस सेवा ही केवळ महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी असेल असा निर्णय दिला. एका बाजूला शासनाने कोटा शहरातून विद्यार्थ्यांना आराम बसमधून मोफत आणले, दुसरीकडे  पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी रोजगाराची संधी शोधत, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दुप्पट तिकीट आकारण्याचा निर्णय म्हणजे गेले दीड महिने अडकून पडले विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. हे सर्व विद्यार्थी परीक्षांच्या अनिश्चित वेळापत्रका अभावी या शहरांमध्ये थांबून होते. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबामधून असल्यामुळे अशा परिस्थितीत यांच्याकडून तिकीटाचे पैसे घेणे हे सरकारला न शोभणारी गोष्ट आहे. यामुळे सरकारने त्वरित आपला निर्णय बदलावा व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सर्व अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने केली आहे.

Related posts

“श्री. शंतनु जोशी” यांचे  “Will me marry me” या विषयावर झाले वेबिनार 

PC News

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना पुणे याच्या मार्फत महिला पुरुष आणि विद्यार्थिनी यांना मास्क वाटप करण्यात आले

PC News

उन्नती सोशल फाउंडेशनकडून गरीब मुलांसमवेत ख्रिसमस साजरा , कुंदाताई याच आमच्या सांता ; चिमुकल्यांची भावना

PC News

अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा लोकार्पण

PC News

अफवेमुळे वाईन शॉप समोर जमली तोबा गर्दी

PC News

आर पी आय (निकाळजे गट)अमित मेश्राम यांचा काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश!!!

PC News

एक टिप्पणी द्या