September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

पृथ्वीराज चव्हाण यांना आजीवन बंदी, कुठे ते वाचा

नवी दिल्ली : करोनाच्या संकटकाळात सरकारनं देवस्थानांच्या ट्रस्टमधून सोनं कर्जस्वरुपात ताब्यात घेण्याचं वक्तव्य काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली. धर्मगुरुंनी तर पृथ्वीराज चव्हाण यांना फैलावर घेतलंय. याच दरम्यान श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या महंत कुटुंबानं एक निर्णय जाहीर केलाय. महंत कुटुंबानं पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजीवन काशी विश्वनाथ मंदिरात बंदी घालत असल्याचं म्हटलंय. सोबतच देशातील इतर ज्योतिर्लिंग पुजाऱ्यांनाही चव्हाण कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचं आवाहन करण्यात आलंय. इतकंच नाही तर ‘पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त’ असल्याचंही महंतांनी म्हटलंय.

करोना संकटकाळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार पॅकेजच्या साहाय्यानं मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी, ‘वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणण्यानुसार, देशात १ ट्रिलियन सोनं आहे. दोन-तीन टक्के व्याजदरावर सोनं सरकारला कर्जरूपानं ताब्यात घेता येईल आणि कालांतरानं परत करता येईल’, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. यावर, भाजपनंही त्यांच्यावर टीका केली.

पृथ्वीराज चव्हाण यांचा हा सल्ला मोठ्या मोठ्या मंदिराच्या महंतांना आणि पुजाऱ्यांना हा आपल्या धर्मावर आघात वाटतोय. त्यामुळेच काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉक्टर कुलपती तिवारी यांनी ‘मी पृथ्वीराज चव्हाण यांचं हे वक्तव्य ऐकून थबकलोय. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच १९८३ च्या काळात काशी विश्वनाथ मंदिरात चोरी झाली होती. या चोरीत काँग्रेसनं मुख्य भूमिका निभावली होती’, असा आरोप करत आपला राग व्यक्त केलाय.

Related posts

कोरोनाच्या नावाखाली खरेदीत वस्तूंमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची कधी करणार आयुक्त चौकशी? मा.आमदार विलास लांडे यांची मागणी

PC News

मा. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देहू येथे भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन

PC News

ईगल हॉटेल चौकात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी भाजप महिला मोर्च्याचे पोलीस आयुक्तांना निवेदन, नागरिकांच्या सुरक्षेसाठी केली मागणी:उज्वला गावडे(अध्यक्षा:भाजप महिला मोर्चा)

PC News

प्रभाग क्र 23, थेरगाव मध्ये सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण यांच्या कडून गरजूंना मोफत अन्नदान

PC News

पुण्यातील एकाच पोलीस स्टेशनचे 127 जण क्वारंटाईन

PC News

थेरंगाव येथे अपना वतन संघटनेचे हमीदभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन!!!

PC News

एक टिप्पणी द्या