September 20, 2021
महाराष्ट्र राजकारण

… तर तो असेल नितीन गडकरींचा राजकीय वारसदार

नागपूर |  आईवडील राजकारणात असले की ते आपल्या मुलांसाठी उमेदवारी मागतात. पण मला त्या प्रकाराचा तिटकारा आहे. माझा राजकीय वारसदार हा माझा कार्यकर्ता असेल, असं वक्तव्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादात बोलत होते.

मी आज राजकारणात आहे. पण माझ्या बायको-मुलांनी कधीही मी राजकारणात आहे म्हणून माझ्या नावाचा उपयोग केला नाही. राजकारण सोडून माझ्या सर्व गोष्टींवर तुमचा अधिकार आहे हे मी माझ्या कुटुबियांना सांगितलं आहे. निवडणुकीच्या काळात कुटुंबीय प्रचारासाठी जातात, तेवढाच त्यांचा राजकारणाशी संबंध असल्याचं गडकरी म्हणाले

नितीन गडकरी यांनी या वेबसंवादात लहाणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच त्यांच्या आईची आठवण जागवली. माझ्या आईमुळेच मी इथपर्यंत पोहचलो. माझ्या आईच्या संस्काराचा माझ्यावर सर्वांत जास्त प्रभाव असल्याचं त्यांनी सांगितलं.

जुन्या काळात संघाला विदर्भ फारसा अनुकूल नव्हता. त्यावेळी आमचे उमेदवार तिथे निवडून यायचे नाहीत. आमचा उमेदवार जवळपास 40 ते 50 हजार मतांनी पराभूत व्हायचा. पण नंतरची स्थित्यांतरे मी पाहिली आहेत. अनेक काँग्रेसच्या लोकांनी भाजपात प्रवेश केला. नंतर नंतर भाजपला विदर्भाची भूमी अनुकुल होत गेली. त्यानंतर आमचा उमेदवार जिथे 50 हजार मतांनी पराभूत व्हायचा आता तिथेच 50 हजार मतांनी विजयी होतो, असं गडकरांनी सांगितलं.

Related posts

१ एप्रिल पासून स्टॅम्प ड्युटी वाढणार ?

PC News

भोसरीतील एस टी महामंडळाचा ट्रायल ट्रॅक लवकरच सुरू, रमाकांत गायकवाड यांची माहिती,भाजपचे दिपक मोढवे पाटील यांच्या मागणीला यश!!!

PC News

“एक रुपयात प्राधिकरण बाधित अनधिकृत घरे नियमितीकरण”ही महासभेची मान्यता फक्त कागदावरच नको – त्याची अंमलबजावणी महत्वाची” – विजय पाटील(मुख्य समन्वयक- घर बचाव संघर्ष समिती)

PC News

होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या आरोग्य सुविधेमध्ये करोडोचा घोटाळा ?

PC News

भाजप नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा – आ.अण्णा बनसोडे

PC News

रायगड मधील खालापूर येथील ठाकूरवाडीला टीसीएफ ची मदत

PC News

एक टिप्पणी द्या