July 26, 2021
पिंपरी चिंचवड

आमदार अण्णा बनसोडेंच्या पाठपुराव्याला यश, पिंपरी चिंचवड मनापा कर्मचार्यांना ७ वा वेतन लागू – आयुक्तांची मान्यता

पिंपरी: (PCNews) दि. १९ मे

पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचारी वर्गास तातडीने ७ वा वेतन आयोग लागू करणेबाबतच्या मागणीला आयुक्तांची मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना आमदार बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मनपा अधिकारी व कर्मचा-र्यांना ७ वा वेतन आयोग लागू करणेबाबतच्या मान्यता देत असल्याचा आदेश दि. २०.१२.२०१९ रोजी दिला होता.

राज्य शासनाने मनपा अधिकारी व कर्मचारीवर्गास ७ वा वेतन आयोग लागू करण्यास काही अटींवर मान्यता दिली होती. शासनाने ज्या अटींवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ७ वा वेतन आयोग लागू करण्यास परावानगी दिली, त्याच अटीवर नवी मुंबई मनपास ही ७वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता दिली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग लागू केला असून पिंपरी –चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचारी वर्गास मात्र ७ वा वेतन आयोग लागू झाला नसल्याने आमदार बनसोडे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे १० मे रोजी मागणी केली होती.

आमदारांनी केलेल्या मागाणीनुसार आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही सुरु केली आणि आज वेतन आयोगाच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केल्याबद्दल आमदार बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

मनपा कर्मचाऱ्यांचे आमदार बनसोडे यांनी अभिनंदन केले असून जबाबदारी वाढली असल्याने शहरातील नागरिकांना उच्च व चांगल्या सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार बनसोडे यांनी मनपा कर्मचारीवर्गास केले आहे.

Related posts

महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा,उपक्रमाचे कौतुक,अनेक मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

PC News

पुण्यातील एकाच पोलीस स्टेशनचे 127 जण क्वारंटाईन

PC News

भोसरीतील एस टी महामंडळाचा ट्रायल ट्रॅक लवकरच सुरू, रमाकांत गायकवाड यांची माहिती,भाजपचे दिपक मोढवे पाटील यांच्या मागणीला यश!!!

PC News

प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

PC News

“महावितरणाने लॉकडाऊनच्या काळात शहरातील वीज ग्राहकांना सहकार्य करावे ” – आमदार अण्णा बनसोडे

PC News

पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता पालट होणार का? विकास कामांना लागला ब्रेक

PC News

एक टिप्पणी द्या