September 20, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड

आरोग्य हितासाठी निगडी येथील पोलिसांना रोगप्रतिकारक किटचे वाटप

प्रतिनिधी : निगडी (PCNews) दि. २२ मे

कोरोनाच्या महामारी पासून सर्व सामान्य नागरिकांचा बचाव करण्यासाठी स्वतचा जीव धोक्यात घालून मागील तीन महिन्यांपासून रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य हितासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी उपमहापौर सौ. शैलजा अविनाश मोरे आणि भाजप युवा मोर्चा चे प्रदेश सचिव श्री अनुप अविनाश मोरे यांच्या वतीने निगडी पोलीस स्टेशन या ठिकाणी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आयुर्वेदिक औषधाच्या किटचे वाटप करण्यात आले.

“गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पोलिसांना कोरोनाचे लागण झाल्याचे समोर आले, तर आपल्या भागातील पोलिसांवर अशी परिस्थिती येऊ नये आणि ते निरोगी राहावेत यासाठी पोलीसांना रोगप्रतिकारक किट देण्याचा निर्णय आम्ही घेतला”, अनुप मोरे म्हणाले.

याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गणेश जवातवड साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री सोनावणे, पोलीस सबइन्स्पेक्टर श्री ज्ञानेश्वर कोकाटे, डॉ. प्रेरणा बेरी, सागर आगरवाल, जयेश मोरे, आशिष राऊत, सागर घोरपडे, गौरव गोळे, शशिकांत आंग्रे, कर्डे काका, आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थिथ होते.

#PCNews

Related posts

मद्यप्रेमींसाठी खुशखबर

PC News

काँग्रेसचे स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबियांची महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अमित मेश्राम यांनी घेतली भेट,काँग्रेस पक्ष नेहमी आपल्या सोबतच!!!

PC News

यशस्वी संस्थेतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘यशोत्सव स्नेहमंगल’ हा कार्यक्रम ऑनलाईन उत्साहात साजरा

PC News

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अमित मेश्राम यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी, निगडी पोलिसात गुन्हा दाखल,आरोपी सोलापूरचा!!!

PC News

चिंचवड च्या राजाचा लोक कलावंतांना मदतीचा हात!!!

PC News

महापालिका निवडणुकीत एक वार्ड एक नगरसेवक : निवडणूक आयोग

PC News

एक टिप्पणी द्या