September 20, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

राज्यात गेल्या 24 तासात 60 बळी

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या नव्याने २,६०८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० वर पोहोचली आहे.
state_1 H x W:
राज्यात गेल्या २४ तासात ८२१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १३ हजार ४०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण १,५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या ६० मृत्यूंपैकी मुंबईमध्ये ४०, पुण्यात १४, सोलापुरात २, वसई विरारमध्ये १, साताऱ्यात १, ठाण्यात १ तर नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वॉरंटाइनमध्ये असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Related posts

गणेश मूर्तिकारांसाठी पी ओ पी च्या मूर्तीवरील बंदी एक वर्ष स्थगित : जावडेकर

PC News

राहण्यासाठी रावेत पेक्षा वाकड बरे – नागरिकांची प्रतिक्रिया

PC News

या डेटिंग ऍप वर बंदी घाला – शिवसेना आमदार मनिषा कायंडे यांची मागणी

PC News

नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत २२कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी नगरमधून ३डॉक्टर अटक,पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेची चमकदार कामगिरी!!!

PC News

दृष्टीहीन समाजात नवी हरित क्रांति घडवतील:पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

PC News

स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर यांच्या प्रयत्नाने १८ते४४वयोगटातील नागरिकांना काका इंटरनॅशनल स्कुल मध्ये मोफत लसीकरण!!!

PC News

एक टिप्पणी द्या