July 26, 2021
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात रायगड युवाशक्ती मंडळाची स्थापना

चिंचवड:प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने नोकरी धंदा, शिक्षणासाठी पिंपरी चिंचवड, पुणे शहरात वास्तव्यास आहेत.
या युवशक्तीला आपल्या गावाशी आणि दुसरी दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगडशी आपले जोडलेले नाळ घट्ट करण्यासाठी रायगड युवाशक्ती या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. शहराची कामगार नगरी म्हणून ओळख असल्याने अनेक कोकणवासीय नोकरी धंदयासाठी शहरात स्थायिक झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील (कोकणातील) विखुरलेला युवक (चाकरमाणी) एकत्र आणण्याचे रायगड युवा शक्तीचे ध्येय – उद्दीष्टे असून
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे पुढील पिढीच्या मनामनांत पोहचविण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड, पुणे परिसरातील रायगड जिल्ह्याच्या युवकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ तयार करणे असे आहे, तसेच मंडळाची सभासद नोंदणीही सुरू असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन आंब्रे यांनी सांगितले.
या वेळी मंडळाचे कार्यकरणी सदस्य विनय मोरे, अवदुत पालांडे, निलेश सांवत, मच्छिंद्र देशमुख, संतोष कळमकर,संकेत म्हामुणकर,सतिश मोरे,श्रीकांत घाडगे,रोशन खोपकर आदी उपस्थित होते.

Related posts

भाजप महिला मोर्चा तर्फे जागतिक योग शिबीर नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न :उज्वला गावडे,(अध्यक्षा,भाजप महिला मोर्चा)

PC News

PPE किट खरेदीसाठी YCM व जिल्हा रुग्णालयास आमदार आण्णा बनसोडे यांनी दिले ५० लाख

PC News

सांगवीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या १६ नायजेरियन तरुणींना अटक

PC News

अक्षय चव्हाण सोशल फाऊंडेशन तर्फे मिठाई वाटपाचा उपक्रम

PC News

प्रसिद्ध बांधकाम उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडी चा छापा

PC News

पिंपरी चिंचवडचे आयुक्त बनले सर्व पक्षाचे कृत्रिम हार्डवैरी,विरोध केला नाही की विकास कामे सुरू!!!

PC News

एक टिप्पणी द्या