September 20, 2021
आरोग्य महाराष्ट्र

धक्कादायक : राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 260 जणांचा मृत्यू

मुंबई : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असून देशभरात मागील 24 तासात 9304 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांची ही वाढ आतापर्यंतची 24 तासातील सर्वाधिक वाढ आहे. तर 260 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 2 लाख 16 हजार 919 वर पोहचला आहे. त्यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 4 हजार 107 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 804 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 47.99 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच ऍक्टिव्ह रुग्ण 1 लाख 6 हजार 737 आहेत.

देशभरातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 74860 झाला आहे. त्यातील 32329 बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 2587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्यात काल कोरोनाच्या तब्बल 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74,860 वर गेली आहे.

या पैकी सध्या राज्यात 39,935 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2587 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 916 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 43.18 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.45 टक्के आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरण च्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करा:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार यांची मागणी

PC News

मोबाईल ऍपमधून कर्ज घेतलाय ? तुमचा छळ होतोय ? तुम्हाला सावध करण्यासाठी ही बातमी

PC News

महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

PC News

यंदाच्या दिवाळीत फटाक्यांवर बंदी ?

PC News

कुंदा भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर शाळेला सॅनिटायजर मशीन भेट

PC News

प्रभाग क्रमांक १७ मध्ये “डॉक्टर आपल्या दारी माझा परिसर माझी जबाबदारी”

PC News

एक टिप्पणी द्या