July 26, 2021
पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र

सलग 15व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली :  

सरकारी पेट्रोलियम वितरण कंपनीने लागोपाठ 15 व्या दिवशी डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवले आहेत. हे इंधन दर संपूर्ण देशात वाढले आहेत. रविवार (21 जून) रोजी मुंबईत पेट्रोल 85.70 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 76.11 रुपयांनी विकले जात आहे. डिझेल आणि पेट्रोलमध्ये एकुण मिळून प्रति लीटर अनुक्रमे 8.28 रुपये आणि 7.62 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलियमवर राज्यस्तरीय करांमुळे (वॅट इत्यादी) विविध ठिकाणी वेगवेगळे दर आहेत.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 85.70 – 76.11
पुणे 86.12 – 75.38
ठाणे 85.30 – 74.56
अहमदनगर 86.21 – 75.48
औरंगाबाद 86.03 – 75.30
धुळे 86.03 – 75.31
कोल्हापूर 85.67 – 74.98
नाशिक 85.87 – 75.14
रायगड 85.28 – 74.55

पेट्रोल-डिझेलमध्ये वाढवले 13 रुपये उत्पादन शुल्क
दिल्लीत या पंधरा दिवसात मुल्यवृद्धीपूर्वी डिझेलचा सर्वात जास्त दर 16 ऑक्टोबर 2018 ला होता.

त्यावेळी दर प्रति लीटर 75.69 रुपये होता. अशाच प्रकारे 4 ऑक्टोबर 2018 ला येथे पेट्रोल 84 रुपयांवर होते, जे आता उच्चांकी दरावर आहे. 14 मार्चला सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क प्रतिलिटर तीन-तीन रुपये वाढवले होते. यानंतर पुन्हा 5 मे रोजी पेट्रोलवर शुल्क 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये आणखी वाढवले.

तेल कंपन्या 7 जूनपासून इंधनाचे दर वाढवत आहेत
तेल कंपन्यांनी मे 2017 पासून आंतरराष्ट्रीय दरांच्या अनुषंगाने दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सुधारणा करण्यास सुरवात केली. जूनपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोजचे बदल सुरू केले आहेत. मार्चच्या मध्यावर जेव्हा कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊनची तयारी सुरू झाली होती, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर खाली येत होते, तेव्हा सरकारने इंधनावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादले आणि महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना केली

Related posts

प्रभाग क्रमांक 16 मधील समाजसेवकांचा “एक हात मदतीचा” असा उपक्रम

PC News

मॉलच्या बाहेर कुपन भरला की सगळ्यांनाच लॉटरी लागतो, नेमकं प्रकरण काय ?

PC News

Covid19: राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु

PC News

स्थानिक भाजप नेत्यांचा रडीचा डाव उघड,शहराचा विकास तर होणार १००%:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

भक्ती शक्ती उड्डाणपुलाचे भाजपने राजकारण थांबवावे,उड्डाणपूल सुरू करण्याची राष्ट्रवादीचे मा.सभापती तानाजी खाडे यांची मागणी!!!

PC News

पिंपरी चिंचवड शहरात रायगड युवाशक्ती मंडळाची स्थापना

PC News

1 टिप्पणी

frolep rotrem June 25, 2020 at 5:56 pm

You have brought up a very wonderful points, thanks for the post.

प्रत्युत्तर द्या

एक टिप्पणी द्या