July 26, 2021
जीवनशैली पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

वाढीव विजबिलांविरोधात ‘आप’ ने लाँच केली राज्यस्तरीय ‘हिसाब दो’ मोहीम

आम आदमी पार्टीच्या वतीने आज वीज दरवाढीच्या विरोधात राज्यभरात ‘हिसाब दो’ मोहीम लाँच केली. आधीच लॉकडाउनमुळे होरपळलेल्या सामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक राज्य सरकारने दिलेला आहे. या विरोधात आपली मोहीम तीव्र करत नागरिकांना या दरवाढी विरोधात संघटित करून राज्य सरकार तसेच वीज नियामक मंडळापर्यंत त्यांच्या तक्रारी पोहचवण्यासाठी ‘आप’ ने ही मोहीम उघडली आहे.

www.hisaabdo.in या वेबसाईटच्या माध्यमातून वीज नियामक मंडळाला वाढीव विजबिलांबाबत आता नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. तसेच या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना दिल्ली व महाराष्ट्राच्या विजबिलांमधील तफावत देखील समजून येणार आहे. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. रंगा राचुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना राचुरे म्हणाले “वीज दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची झालेली आहे. हे माहीत असताना देखील दरवाढ लागू करणे म्हणजे सामान्यांचे शोषण करणारे आहे. लॉकडाउन काळातील 4 महिन्यांचे प्रति महिना 200 युनिट वीज बिल माफ करावे यासाठी पक्षाने निवेदनांद्वारे राज्य सरकारकडे मागणी केली आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज आम्ही ही वेबसाईट लाँच करत आहोत. या अन्यायी दरवाढी विरोधात अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. जोपर्यंत ही वीज दरवाढ मागे घेतली जात नाही व 200 युनिट बिल माफ केले जात नाही, तोपर्यंत ‘आप’ चे आंदोलन चालूच राहील.”

यावेळी उपस्थित पक्षाचे सह-संयोजक श्री. किशोर मंध्यान म्हणाले “दिल्ली सरकारने राज्याच्या वीज वितरण प्रणालीमध्ये क्रांतिकारक सुधार करून नागरिकांना प्रति महिना 200 युनिट वीज मोफत दिले. हे काम जर दिल्लीत होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही?

राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले “देशातील सर्वात महाग वीज असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर लागतो. वीज वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी आपले राज्य सरकार प्रयत्न करताना दिसून येत नाही.”

या पत्रकार परिषदेमध्ये ‘आप’ चे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक, राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन, राष्ट्रीय सह-सचिव रूबेन मास्करेहनस, युवा आघाडी प्रदेशाधयक्ष अजिंक्य शिंदे, तसेच ‘आप’ राज्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

Related posts

उपमहापौर केशव घोळवे यांचा तडकाफडकी राजीनामा

PC News

“Before we were our Bodies” या विषयावर श्री. शंतनु जोशी ह्यांचे वेबिनार 

PC News

प्रियकराच्या घरी पोहचली प्रेयसी आणि म्हणाली, ‘माझी संपूर्ण संपत्ती घे, पण…’

PC News

धक्कादायक : चिंचवड स्टेशन परिसरात 18 नवीन रुग्ण आढळले

PC News

इयत्ता 1ली ते 12वी च्या अभ्यासक्रमात पुन्हा 25% कपात – राज्य शिक्षण विभाग

PC News

उपवास या विषयावर श्री शंतनु जोशी यांचे मार्गदर्शन

PC News

एक टिप्पणी द्या