September 20, 2021
भारत व्यापार

नवीन ग्राहक संरक्षण कायदा आजपासून देशभरात लागू, ग्राहकांसाठी नव्या कायद्यात काय असणार सुविधा ?

नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण कायदा 2019 (Consumer Protection Act 2019) आजपासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला आहे, सरकारने गुरुवारी म्हणजेच, 15 जुलै रोजी देशभरात कायदा लागू करण्यासाठी अधिसुचना जारी केली होती. नवीन ग्राहक संरक्षण कायदा जुन्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा घेणार असून त्यामुळे जुना कायदा कालबाह्य होणार आहे. नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना अनेक नवे अधिकार मिळणार आहेत.

जुना ग्राहक संरक्षण कायदा 1986 (Consumer Protection Act 1986)मध्ये सुधारणा करून मोदी सरकारने ग्राहक संरक्षण कायदा 2019 (Consumer Protection Act 2019) हा कायदा देशभरात लागू केला आहे. मोदी सरकारकडून या कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. हा कायदा जानेवारी 2020मध्ये लागू करण्यात येणार होता. परंतु, काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. त्यानंतर यासंदर्भात तारिख मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली. परंतु, मार्च महिन्यापासून देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आाला. त्यामुळे याकाळात ते शक्य झालं नाही.

ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यास, कंपन्यांचे नुकसान होऊ शकते

ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना बळ मिळालं असून त्यांना फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे दाद मागता येणार आहे. खासकरून ऑनलाईन व्यवहारांमध्ये ग्राहकांच्या सोयींकडे करण्यात आलेलं दुर्लक्षं कंपन्यांना महागात पडू शकतं. नव्या कायद्यांतर्गत ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या जाहिराती देण्याऱ्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. नवीन ग्राहक कायदा लागू झाल्यानंतर ग्राहकांच्या तक्रांरींचं निरसन लवकर होण्यास मदत होणार आहे.

नव्या कायद्यांतर्गत नव्या कायद्यांतर्गत ग्राहक न्यायालयांसह केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) तयार करण्यात आले आहे. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे प्राधिकरण स्थापन केले गेले आहे. नव्या कायद्यांतर्गत ग्राहक कोणताही माल खरेदी करण्यापूर्वीच सीसीपीएकडे वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल तक्रार करू शकतात.

Related posts

कोणत्याही दबावाखाली वाधवन कुटुंबाला पत्र दिले नाही – आयपीएस अमिताभ गुप्ता

PC News

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे निधन

PC News

नवाजुद्दीन घरी पोहचला….

PC News

विद्या बालन देणार 1000 पीपीई किट

PC News

2022 पर्यंत 30 लाख आयटी (IT) नोकऱ्या जाणार ?

PC News

Before Birth Itinerary या विषयावर sj सरांनी घेतले निवासी शिबिर 

PC News

एक टिप्पणी द्या