July 26, 2021
महाराष्ट्र

आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुणे दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकदिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत. पुण्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

पुणे शहर तसंच पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांची दररोजची आकडेवारी प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. शहरात दररोज जवळपास दीड हजार ते दोन हजार रूग्ण वाढतायेत. दुसरीकडे कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात यावी म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने कोरोना उपाययोजना कश्या पद्धतीने केल्या आहेत, याचा आढावा मुख्यमंत्री आज घेतील.

पुणे विभागीय आयुक्तालयात होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, पुण्याचे महापालिका आयुक्त, पुण्याचे पोलिस आयुक्त, महत्त्वाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईकडे प्रस्थान करतील. साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री पुण्यात पोहचतील. ससून किंवा नायडू रूग्णालयाला मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Related posts

पंकज बगाडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार आघाडी हवेली तालुका अध्यक्षपदी निवड

PC News

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पे अँड पार्क ला पतित पावन संघटनेचा विरोध,महापालिका आयुक्तांना दिले निवेदन !!! : राजेश दळशे(अध्यक्ष, पिंपरी चिंचवड)

PC News

पिंपरी चिंचवडचे केशव अरगडे यांची जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून प्रशिक्षक म्हणून निवड

PC News

पर्यटकांसाठी खुशखबर : MTDC रिसॉर्टचे बुकिंग सुरू

PC News

पेट्रोल ला पर्याय सीएनजी, (CNG) तर डिझेल ला पर्याय एलएनजी (LNG), नागपूर मध्ये पहिला LNG पंप सुरू !

PC News

अभिनेते विक्रम गोखले यांना होणार अटक ?

PC News

एक टिप्पणी द्या