September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी च्या अध्यक्षपदी सचिन काळभोर, तर सचिन खोले यांची सेक्रेटरी पदी निवड

चिंचवड : प्रतिनिधी (PC News)

9 ऑगस्ट 2020 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब वाल्हेकरवाडी चे प्रेसिडेंट रो. सचिन काळभोर आणि सेक्रेटरी रो. सचिन खोले यांनी पदभार स्वीकारला. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रेसिडेंट,सेक्रेटरी व नवनिर्वाचित संचालक मंडळ यांचा पदग्रहण सोहळा भारतातील पहिल्या महिला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. रश्मी कुलकर्णी यांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी असिस्टंट गव्हर्नर संतोष अग्रवाल व डिस्ट्रिक्ट टीम, देशातील आणि जगभरातील रोटरी सदस्य zoom मीटिंग द्वारे उपस्थित होते.

सन 2019- 20 या मागील वर्षीचे प्रेसिडेंट रो. Adv सोमनाथ हारपुडे यांनी रो. सचिन काळभोर यांच्याकडे पदभार देताना त्यांचे कालावधीमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच covid-19 आल्यामुळे परंतु covid-19 सारख्या कठीण कळतही मेडिकल प्रोजेक्ट्स, हॉस्पिटलला PPE किट वाटप, sanitiser, तुरटी वाटप प्रोजेक्ट्स केले.
पदभार स्वीकारताना 2020-21 या कालावधीमध्ये मध्ये नवीन सदस्य रोटरी परिवारात समाविष्ट करून रोटरी जास्तीत जास्त जनमानसात रुजविण्याचा मानस प्रेसिडेंट श्री सचिन काळभोर यांनी व्यक्त केला. सर्वांचे सहकार्याने वेगवेगळे क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त प्रोजेक्ट करून पवना नदी जलपर्णी मुक्त, सांडपाणी विरहीत आणि प्रदूषण मुक्त करणे यासाठी ग्लोबल ग्रँट मिळवून स्वच्छ पाणीपुरवठा देण्यासाठी प्रेसिडेंट सचिन काळभोर आणि सेक्रेटरी सचिन खोले प्रयत्नशील राहू अशी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष प्रदिप वाल्हेकर यांनी केले,तसेच स्वाती प्रदीप वाल्हेकर, स्वाती सूनील वाल्हेकर, सोमनाथ हरपुडे, राजेंद्र चिंचवडे, सुधीर मरळ शेखर चिंचवडे, अतुल क्षिरसागर, रामेश्वर पवार, गणेश बोरा हे सदस्य आणि व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.

Related posts

नागरिकांनो पहाटे ४ वाजता लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका,आजूबाजूच्या रहिवाश्यांना त्रास देऊ नका !!!!!!

PC News

फोटोग्राफी कॅमेऱ्याचे हफ्ते दिले नाही म्हणून १०दुचाकी दिल्या पेटवून,आरोपीला अटक

PC News

धक्कादायक घटना : बेड न मिळाल्याने ४१ वर्षीय महिलेची आत्महत्या

PC News

प्रश्नांच्या गुंत्यामधून विचारांच्या स्पष्टतेकडे घेऊन जाणारी वेबिनार्स 

PC News

शहिद दिनानिमित्त केशव अरगडे यांची सायकलवारी गडकोटांवरी मोहीमेची श्री क्षेत्र राजगुरूनगरला भेट, अनेकांनी केली मोहिमेची कौतुक

PC News

ठेकेदारांच्या हितासाठी २०८ कोटींची बिले अदा, मात्र नागरिकांना ठेंगा

PC News

एक टिप्पणी द्या