July 26, 2021
गुन्हा महाराष्ट्र

हडपसर येथील एका प्रसिद्ध सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आज पुणे पोलिसांकडून आत करण्यात आले आहे.

पुणे : प्रतिनिधी (PCNews)

हडपसर येथील एका प्रसिद्ध सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आज पुणे पोलिसांकडून आत करण्यात आले आहे.

युनिट-3चे व. पो. नि. राजेंद्र मोकाशी, पो. उप.नि किरण अडागळे यांनी स्टाफ सह फ्लॅट नंबर 406,मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे येथे छापा टाकून जंगल्या सातपुते याच्यासह त्याच्या इतर 6 साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे, तसेच एक भारतीय बनावटीचा रिव्हॉल्वर व 6 काडतुसे व एक बारा बोर रायफल व दोन कोयते अशी हत्यारे तसेच एक फॉर्च्युनर गाडी व अॅक्टिवा मोटर सायकल अशा एकूण 14 लाख 74 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1320/2020 भा.द.वि कलम 399,402 भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), 4(25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1857 चे कलम 51 (ब),महाराष्ट्र कोविड 19 नियम 2020 चे कलम 11,आपत्ती व्यवस्थापन चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर सर्व आरोपीना जागेवरच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत विशाल उर्फ जंगल्या श्याम सातपुते वय 30 वर्षे
(रा.पीएमसी कॉलनी D/82 घोरपडी पेठ पुणे.)
सदर आरोपी वर पुणे शहरात 302, 399, 307 इ चे सहा गुन्हे दाखल आहेत, सदर आरोपी 302 च्या केसमध्ये पॅरोल वर आहे

राजू शिरीष शिवशरण वय 28,
(रा.सर्वे नंबर 110, ठोंबरे वस्ती)
सदर आरोपी वर दोन गुन्हे दाखल आहेत पैकी एक भा द वि. 302.

पंकज सदाशिव गायकवाड (वय 34,रा -: मु.पो. कोलवडी, ता -: हवेली , जिल्हा -: पुणे)
दाखल गुन्हे-:
सदर आरोपी वर 302चे 2 व 395 चा 1 असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. आरोपी सद्या जामिनावर आहे.

आकाश राजेंद्र सकपाळ। (वय 26 रा-: B/1 फ्लॅट नं 3,रविराज टेरेस,सुखसागर नगर) सदर आरोपी वर 302 चा गुन्हा असून सद्या जामिनावर आहे.

गणेश मारुती कुंजीर (वय.27 रा -: कुंजीर वस्ती,थेऊर,ता-: हवेली,पुणे)सदर आरोपी वर 379चा एक गुन्हा दाखल आहे.

रामेश्वर बाळासाहेब काजळे (वय 33 रा. वडगाव शेरी.)

ऋषिकेश राजेंद्र पवार (वय 19 रा -: मु पो कोलवडी,ता -: हवेली,पुणे)

सदर कारवाई मा. अशोक मोराळे सो (अप्पर पो. आयुक्त गुन्हे ), मा. बच्चन सिंग सो (पो. उपायुक्त, गुन्हे ), मा. शिवाजी पवार सो (सहा. पो. आयुक्त, गुन्हे )यांचे मार्गदर्शन खाली करण्यात आली.

Related posts

पोलिस फ्रेंडस वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १३ हजार रुपयांची मदत

PC News

भोसरीतील एस टी महामंडळाचा ट्रायल ट्रॅक लवकरच सुरू, रमाकांत गायकवाड यांची माहिती,भाजपचे दिपक मोढवे पाटील यांच्या मागणीला यश!!!

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 16 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

PC News

दिलासादायक : पिंपरी चिंचवड मधील मध्यम आणि मोठे उद्योग 100% लोकशक्तीसह सुरू करण्याचे आदेश तर आयटी कंपन्यांना 50% साठी परवानगी

PC News

मेडीकल मालकासह ३तरुणांना रेमडेसीविर विकताना अटक,वाकड पोलीसांची धडक कारवाई

PC News

संदीप पवार यांच्या कडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला१लाख ५१हजारांचे योगदान,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धनादेश सुपूर्त!!!

PC News

एक टिप्पणी द्या