July 26, 2021
जीवनशैली महाराष्ट्र व्यापार

पर्यटकांसाठी खुशखबर : MTDC रिसॉर्टचे बुकिंग सुरू

पुणे । राज्यात कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम होत आहे. यामध्ये राज्यातील पर्यटनावर देखील सावट आले आहे.

सध्या सहा महिन्यानंतर देश पुर्ववत सुरू झाला आहे. कोरोनाची भिती मात्र अद्यापही कायमच आहे. असे असले तरी पर्यटकांसाठी आता आनंदाची बातमी आहे.

महत्त्वाच्या पर्यटनस्थळी गेल्यानंतर निवासासाठी असलेले शासकीय रिसॉर्ट आता कोरोनाची नियमावली पाळून ३३ टक्के कक्ष खुले करण्यात आलेले आहे. घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

यामध्ये पर्यटकांना ऑनलाईन बुकींग करता येणार आहेत. पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास (MTDC) नागपूर, माथेरान, ताडोबा, शिर्डी पिलग्रीम्स इन, अजिंठा फरदापूर ,अजिंठा टी जंक्शन, औरंगाबाद येथील ३३% कक्षांचे ऑनलाईन आरक्षण सुरू झाले आहे.

कोरोनापासून खबरदारीच्या सर्व उपायांसह पर्यटकांचे स्वागत करण्यास येथील व्यवस्था सज्ज झाली आहे. राज्यभरात कोरोनाच्या संकटाने पर्यटनासह सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट आले आहे.

आता काही प्रमाणात लोक बाहेर पडू लागले आहे. राज्यसरकारच्या वतीने पर्यटन स्थळे खुली करावी अशी मागणी आहे. अर्थात ती लवकरच सुरु होतील अशी चिन्हे आहेत.

पर्यटकांना सेल्फ डिक्लरेशनचा फॉर्म भरून देणे अनिवार्य असून कोविडबाबतची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पर्यटकाचे तापमान, त्याच्या शरिरातील ऑक्सिजनची लेव्हल देखील तपासली जाणार आहे. फेसमास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर देखील अनिवार्य असून गर्दी होणार नाही याची देखील काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला केवळ 33 टक्के बुकिंग केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं यामध्ये वाढ केली जाणार आहे. 33 टक्के ऑनलाईन बुकिंगला प्राधान्य दिलं जाणार असून त्यानंतर काऊंटर बुकिंग केली जाणार आहे,. पण, 33 टक्के ऑनलाईन बुकिंग पूर्ण झालेली असल्यास काऊंटर बुकिंग मात्र केली जाणार नाहीत. याबाबत शासनानं आदेश देखील काढले असून यामध्ये पर्यटकानं काय काळजी घ्यावी, नियम काय असणार आहेत याची इत्यंभूत माहिती दिली आहे.

पर्यटकांची सुरक्षितता ठेवत पर्यटनाचा आनंद देण्याचे मोठे आवाहन देखील राहणार आहे. औरंगाबाद जिल्हयातील शासकीय तसेच खासगी रिर्सार्ट पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.

येणाऱ्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली तर लवकरच मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे सुरू होतील.

Related posts

मी सुरक्षित राहणार , इतरांना ही सुरक्षित ठेवणार – शिवसेनेच्या मंदा फड यांचा नारा

PC News

शहिद दिनानिमित्त केशव अरगडे यांची सायकलवारी गडकोटांवरी मोहीमेची श्री क्षेत्र राजगुरूनगरला भेट, अनेकांनी केली मोहिमेची कौतुक

PC News

पिंपरी चिंचवडचे केशव अरगडे यांची जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून प्रशिक्षक म्हणून निवड

PC News

मॉन्सून मुंबईत कधी होणार दाखल ?

PC News

ही कार एकदा चार्ज केल्यावर चालते 800 किलोमीटर

PC News

बाणेर-बालेवाडी सारखेच विकसीत होणार हे गांव, गुंतवणूकदारांची होणार चांदी!

PC News

एक टिप्पणी द्या