July 26, 2021
इतर भारत महाराष्ट्र राजकारण

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे.

पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ सुनावणी पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे

त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

या प्रकरणावर विचार करण्यासाठी मोठ्या खंडपीठाची निर्मिती केली जाईल, असं सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी मराठा आंदोलनाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी सरकारने योग्य बाजू मांडली नाही म्हणून सरकारचा निषेध केला आहे.

देशातील सर्वच राज्यानी 50 टक्या पेक्षा अधिकच आरक्षण दिल आहे, सुप्रीम कोर्टाने आज पर्यंत कुठल्याही प्रकरणात स्थगिती दिलेली नाही. फक्त महाराष्ट्रासाठी वेगळा निर्णय का घेतला गेलाय, याच कारण शोधलं गेलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया मराठा आंदोलकांकडून येत आहेत.

 

Related posts

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन च्या वतीने डॉक्टरांचा सन्मान, आणि वृक्षारोपण!!!

PC News

सलग 15व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

PC News

महापालिकेच्या मालकीच्या व्यायाम शाळेवरून महापालिकेचे नाव झाले गायब,आयुक्तांनी नाव टाकण्याचे तातडीने द्यावे आदेश:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

१२०० परप्रांतीय कामगार झारखंडला ट्रेन मधून रवाना

PC News

टुरिस्ट व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी – महाराष्ट्र वाहतुक सेनेचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

PC News

पोलिस फ्रेंडस वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १३ हजार रुपयांची मदत

PC News

2 टिप्पण्या

AnooGuism May 8, 2021 at 10:30 am

viagra kutu fiyatД± https://llviagra.com/ black stallion viagra

प्रत्युत्तर द्या
AnooGuism May 15, 2021 at 5:21 am

cat are efect viagra https://llviagra.com/ viagra to panda

प्रत्युत्तर द्या

एक टिप्पणी द्या