September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

पंकज बगाडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार आघाडी हवेली तालुका अध्यक्षपदी निवड

चिंचवड : प्रतिनिधी (पी.सी.न्यूज)
प्रहार जनशक्ती पक्षाची पक्ष बांधणी पिंपरी चिंचवड शहरासह तालुक्यात सुरू झाल्याचे दिसून येत आहे तरी नुकतेच नियुक्त झालेले हवेली तालुका अध्यक्ष महेश कनकुरे यांनी कार्यक्षमतेप्रमाणे कार्यकर्त्यांना योग्य जबाबदारी देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
तर तालुक्यात पक्षाला अजून बळकट करण्यासाठी पंकज रावसाहेब बगाडे यांची हवेली तालुका कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी आज निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा संघटक शिवश्री नीरज कडू यांच्या निर्देशानुसार पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष महेश कणकुरे यांच्या हस्ते पंकज रावसाहेब बगाडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, या वेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील कामगारांच्या समस्या सोडवणे व त्यांचा हक्क मिळवून देण्याचा उद्देशाने कामगार आघाडीची स्थापना करण्यात आली असून नावनिर्वाचित अध्यक्ष पंकज बगाडे यांनी नियुक्ती पत्र स्वीकारताना कामगारांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार अशी प्रतिज्ञा घेतली. तसेच कामगारांनी आपल्या समस्यांसाठी मला संपर्क करावा असेही आवाहन त्यांनी वृत्तपत्र माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related posts

भोसरी मधील स्टेट बँकेचे एटीएम फोडणारे ३दरोडेखोरांना हरियाणा मधून अटक,भोसरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!!!

PC News

लहानग्या वेद खेडकरला शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचे मदतीचे आवाहन !!!: शेखर चिंचवडे, (अध्यक्ष)

PC News

राहण्यासाठी रावेत पेक्षा वाकड बरे – नागरिकांची प्रतिक्रिया

PC News

चिंचवड मधील नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी सामाजिक भावनेतून नामवंत डॉक्टरांच्या दवाखाण्याचे उद्घाटन

PC News

पुणे कॅम्प येथील मासळी बाजार मध्ये लागली भीषण आग

PC News

यशस्वी संस्थेतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘यशोत्सव स्नेहमंगल’ हा कार्यक्रम ऑनलाईन उत्साहात साजरा

PC News

एक टिप्पणी द्या