June 24, 2021
दुनिया भारत व्यापार

#BoycottAmazon हिंदू देवी देवतांचे चित्र असलेले अंतर्वस्त्र तसेच पायपुसणे विक्रीला असल्याने वाद

दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ट्विटरवर #BoycottAmazon हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. अनेक भारतीयांनी ट्विटरवरुन हा हॅशटॅग वापरुन कंपनीच्या प्रोडक्टवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अ‍ॅमेझॉनवर हिंदू संस्कृतीचा अपमान करणाऱ्या गोष्टींची विक्री केली जात असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. खास करुन दारामध्ये टाकायच्या डोअर मॅटवर म्हणजेच पायपुसण्यांवर ॐ चे पवित्र चिन्ह तसेच अंतर्वस्त्रांवर हिंदू देवी-देवतांची चित्र असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

अनेक देशांमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये मानाचे स्थान असणाऱ्यादेवी-देवतांचे फोटो असणारे प्रोडक्ट विकले जातात.

यामध्ये अगदी डोअर मॅटपासून ते अंतर्वस्त्रांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. याच प्रोडक्टचे फोटो पोस्ट करत परदेशातील तसेच भारतातील अनेक ट्विपल्सने अ‍ॅमेझॉनने हे प्रोडक्ट विकणे तातडीने बंद करावे अशी मागणी केली आहे. अनेकांनी अ‍ॅमेझॉनचे अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याची मागणीही केल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरुन ट्विट करणाऱ्यांमध्ये परदेशात असणाऱ्या भारतीयांचाही समावेश आहे. भारतामध्ये असे प्रोडक्ट विकले जात नसले तरी जगातील इतर देशांमध्ये असे प्रोडक्ट विकून हिंदू संस्कृतीचा अपमान केला जात असल्याचा आरोप अनेकांनी ट्विटवरुन केला आहे.

Related posts

ही कार एकदा चार्ज केल्यावर चालते 800 किलोमीटर

PC News

पर्यटकांसाठी खुशखबर : MTDC रिसॉर्टचे बुकिंग सुरू

PC News

पेट्रोलच्या किंमतीने गाठला उच्चांक, जनता त्रस्त

PC News

वाकड मध्ये या ठिकाणी होतोय फिनिक्स मॉल

PC News

विप्रो कडून  पुण्यात हिंजवडी येथे  विशेष कोविड रुग्णालयाची उभारण

PC News

किसान योजनेतील 6 हजार मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांना करावी लागेल ‘ही’ नोंदणी

PC News

4 टिप्पण्या

AnooGuism May 4, 2021 at 10:35 pm

ayurvedic equivalent to viagra http://llviagra.com/ – action du viagra chez la femme cialis viagra erfahrungen

प्रत्युत्तर द्या
AnooGuism May 12, 2021 at 2:25 am

take viagra young http://llviagra.com/ hvordan fГҐr man viagra

प्रत्युत्तर द्या
AnooGuism May 18, 2021 at 1:35 pm

venta de viagra en almeria http://llviagra.com/ si un joven toma viagra

प्रत्युत्तर द्या
AnooGuism May 22, 2021 at 2:30 pm

viagra chimie https://llviagra.com/ contraception and viagra

प्रत्युत्तर द्या

एक टिप्पणी द्या