June 24, 2021
दुनिया व्यापार

ही कार एकदा चार्ज केल्यावर चालते 800 किलोमीटर

Lucid मोटर्सची एक नवी कार मार्केटमध्ये येत आहे. हिचे नाव Air इलेक्ट्रिक सेदान आहे. द सनच्या अहवालानुसार, फुल चार्ज केल्यानंतर Lucid मोटर्सची ही कार 517 मैल (जवळपास 832 किलोमीटर) चालते.

ही कार 2021 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे

Lucid मोटर्सच्या या कारची रेंज टेस्ला (Tesla) च्या टॉप-इंड कार्सपेक्षा अधिक असणार आहे. Lucid Air इलेक्ट्रिक कार 2.5 सेंकदाहूनही कमी वेळेत 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते असं कंपनीने म्हटलं आहे.Lucid गेल्या काही वर्षांपासून या कारवर काम करत होती. कंपनीने मंगळवारीच घोषणा केली आहे की तिच्या नव्या सेदानचा अंदाजे वेग 517 मैल (832 किलोमीटर) असणार आहे.
Lucid मोटर्सचे सीईओ पीटर रॉलिन्सन यांच्या मते, सुरुवातीला Air इलेक्ट्रिक सेदानची किंमत 100,000 डॉलरहून अधिक (जवळपास 75 लाख रुपये) असेल. Lucid चे सीईओ रॉलिन्सन म्हणाले की, या इलेक्ट्रिक कारचे कमी किंमतीतील वेरियंटही नंतर येणार आहेत
स्वतंत्रपणे केलेल्या चाचणीत या कारचा वेग तपासण्यात आला असल्याची माहिती कंपनीने दिली. Lucid Air नंतर कंपनी वर्ष 2023 च्या सुरुवातीलाच एक SUV सादर करणार आहे, जी याच व्हेईकल प्लॅटफॉर्मवर तयार झालेली असेल अशी माहितीही रॉलिन्सन यांनी दिली.

Related posts

One Plus 9 चे 3 नवीन स्मार्टफोन भारतात लाँच

PC News

ऐतिहासीक निर्णय: वडिलांच्या संपत्तीत आता मुलींनाही समान वाटा

PC News

धक्कादायक : अभिनेता सुशांत सिंह राजपूतनी गळफास घेऊन केली आत्महत्या

PC News

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंह यांचा 91व्या वर्षी निधन

PC News

2022 पर्यंत 30 लाख आयटी (IT) नोकऱ्या जाणार ?

PC News

पर्यटकांसाठी खुशखबर : MTDC रिसॉर्टचे बुकिंग सुरू

PC News

एक टिप्पणी द्या