June 24, 2021
पिंपरी चिंचवड

आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराचे सुशोभीकरण लवकर करावे,फेहमीदा जावेद शेख यांची महापालिकेकडे मागणी

आकुर्डी:प्रतिनिधी
प्रभाग १४ मधील विठ्ठल मंदिर परिसरात सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या पत्नी फेहमीदा जावेद शेख यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनात केली आहे.
नगरसेवक जावेद शेख यांनी या विषयावर योग्य पाठपुरावा केला होता याची दखल घेत महापालिका आयुक्त यांनी भेट देऊन पालिका सभागृहात या विषयी माहिती दिली होती मात्र काही तांत्रिक अडचणी असल्याने विठ्ठल मंदिर सुशोभीकरण लांबले असल्याचे दिसून येते आता पुन्हा हा विषयावर चर्चा करून काम सुरू करावे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
आकुर्डी मधील विठ्ठल मंदिरात जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी मुक्कामी असते त्यामुळे या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिर प्राचीन असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
महापालिका प्रशासनाने या ठिकाणी सुशोभीकरण केले तर महापालिकेच्या लौकिकात नक्कीच भर पडेल अशी चर्चा आकुर्डी परिसरात नागरिकांमध्ये सुरू आहे. तरी महापालिका आयुक्त यांनी याविषयी योग्य निर्णय घेऊन विठ्ठल मंदिराचे काम सुरू करावे अशी मागणी फेहमीदा जावेद शेख यांनी आयुक्तांना केली आहे.

Related posts

अनुप मोरे यांना कोरोनाची लागण

PC News

भाजप महिला मोर्चा तर्फे जागतिक योग शिबीर नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न :उज्वला गावडे,(अध्यक्षा,भाजप महिला मोर्चा)

PC News

“एक रुपयात प्राधिकरण बाधित अनधिकृत घरे नियमितीकरण”ही महासभेची मान्यता फक्त कागदावरच नको – त्याची अंमलबजावणी महत्वाची” – विजय पाटील(मुख्य समन्वयक- घर बचाव संघर्ष समिती)

PC News

पंकज बगाडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार आघाडी हवेली तालुका अध्यक्षपदी निवड

PC News

वाकड पोलिसांनी थेरंगाव मधील१०जणांच्या सुमित माने टोळीवर केली मोक्का कारवाई, वाकड पोलीस जोमात!!!

PC News

शिवसेनेच्या महिला संघटिका श्रीमती मंदा फड यांच्या प्रयत्नांना यश महापालिकेकडून महिला बचत गटांच्या खात्यात रक्कम जमा

PC News

एक टिप्पणी द्या