December 8, 2021
भारत व्यापार

फक्त पाच दिवसांत लाखो कमावण्याची संधी

दि: २६ जानेवारी २०२१

बजेट येण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. यापूर्वी, बजेटनंतर बाजार कोणत्या मार्गाने जाऊ शकतो, असा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच कोणत्या शेअर्समधून कमाई होऊ शकते याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पण असे काही शेअर्स आहेत ज्यांनी अर्थसंकल्पाआधीच धमाल उडवून दिली आहे. या शेअर्सनी मागील व्यापार आठवड्याच्या 5 दिवसात 35% ते 67% पर्यंत रिटर्न दिले आहे. आपल्याला एफडीमधून एवढे उत्पन्न मिळवायचे असेल तर आपल्याला बरीच वर्षे लागतील.

पण शेअर बाजारामध्ये जितकी जास्त नफा मिळण्याची संधी आहे तेवढे जास्त रिस्क देखील आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी रिस्क फॅक्टर विसरू नका. येथे आम्ही तुम्हाला त्या 5 शेअर्सविषयी सांगणार आहोत ज्यांनी केवळ 5 दिवसांत गुंतवणूकदारांना मालामाल केले.

आदित्य व्हिजन

आदित्य व्हिजन ही एक छोटी कंपनी आहे, ज्याचे बाजार भांडवल सध्या फक्त 76.92 कोटी रुपये आहे. परंतु या छोट्या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात मोठी धमाल निर्माण केली आहे. कंपनीच्या शेअर्सने 67.19 टक्के रिटर्न दिले. आठवड्याच्या सुरूवातीला हा शेअर  38.25 रुपये होता, तर शुक्रवारी तो  63.95 रुपयांवर बंद झाला.

जेके टायर

जेके टायर हा एक शेअर आहे ज्याने गुंतवणूकदारांना फक्त 5 दिवसात 50.66% परतावा दिला आहे. शेअर्सनी गुंतवणूकदारांची रक्कम अवघ्या पाच दिवसांत 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक 3 लाख केली. जेके टायरचे शेअर्स 90.30 रुपयांवरून 136.05 रुपयांपर्यंत नेले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल सध्या 3,349.97 कोटी रुपये आहे.

एंजेल फाइबर्स

एंजेल फायबर्सने गेल्या ट्रेडिंग आठवड्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले. मागील आठवड्यात शेअर्सनी 42.78 टक्के रिटर्न दिला. एंजल फायबर्सचा शेअर 9.49 रुपयांवरून 13.55 रुपयांवर नेला. अँजेल फायबर्सची बाजारपेठ सध्या केवळ 33.88 कोटी रुपये आहे.

म्हणजेच ही एक छोटी कंपनी आहे. अशा छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये अस्थिरतेची शक्यता जास्त असते हे लक्षात घ्या.

संगम रिन्यूएबल्स

संगम रिन्यूएबल्सनेही गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांची झोळी पैशानी भरवली. या कालावधीत त्याचा शेअर 15.90 रुपयांवरुन 22.11 रुपये झाला. म्हणजेच या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना 39.06 टक्के परतावा मिळाला. या कंपनीची मार्केट कॅप 46.02 कोटी रुपये आहे. फक्त 5 दिवसात 46% रिटर्न एफडी किंवा इतर कोठे मिळणे शक्य नाही.

एमएफएल इंडिया

एमएफएल इंडियाच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 35.29 टक्के परतावा दिला. एमएफएल इंडियाचा शेअर 5 दिवसांत 0.17 टक्क्यांनी वाढून 0.23 रुपये झाला. या कंपनीचे बाजार भांडवल फक्त 8.29 कोटी रुपये आहे.

Related posts

पेट्रोलच्या किंमतीने गाठला उच्चांक, जनता त्रस्त

PC News

१ एप्रिल पासून स्टॅम्प ड्युटी वाढणार ?

PC News

न्यूजपेपर मध्ये खाद्यपदार्थ घेण्यास टाळावे, आरोग्यास होऊ शकते हानी

PC News

चिंचवडगावातील खैरमोडे परिवाराकडुन विवाह प्रसंगी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी समर्पण

PC News

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंह यांचा 91व्या वर्षी निधन

PC News

ठेकेदारांच्या हितासाठी २०८ कोटींची बिले अदा, मात्र नागरिकांना ठेंगा

PC News

एक टिप्पणी द्या