September 20, 2021
पिंपरी चिंचवड

वाकड विभागाचे ACP गणेश बिरादार यांना सेवेतून बडतर्फ करा – अपना वतन संघटनेचे गृहमंत्र्याना पत्र

चिंचवड:प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यास धमकावून जबरदस्तीने व्हिडीओ बनवून घेऊन अपमानास्पद वागवणूक दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या विषयावर अपना वतन संघटनेने महाविकास आघाडी चे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे तक्रार केली आहे.


सामाजिक कार्यकर्त्यास धमकावून जबरदस्तीने व्हिडीओ बनवून घेऊन अपमानास्पद वागवणूक दिल्याचा गंभीर प्रकरणाची चौकशी होऊन वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार याना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष मा. सिद्दीकभाई शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलीस खात्याला लाजवणारा घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मालिन होत आहे. पर्यायाने राज्यसरकारच्या करभरवर जनतेकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. गणेश बिरादार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी श्री. सतीश काळे यांचा प्रचंड मानसिक छळ केलेला आहे. याची श्री. सतीश काळे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे दि. २५/०१/२०२१ रोजी लेखी तक्रार केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हंटले आहे कि, आर्वच्च ,उर्मट ,उद्धटपणे ओरडून अपमानास्पद वागवणूक दिलेली आहे. तसेच खोटे गुन्हे दाखल करून येरवडा जेलला पाठवण्याची भाषा , त्यांच्या व्यावसायिक दुकानांबाबत बोलून आयुष्य उध्वस्त करण्याची धमकी दिली. रविशंकर बाबत तक्रार घेण्यासाठी जबरदस्तीने धमकाऊन व्हिडीओ बनवून घेऊन तो प्रसारित करण्यास भाग पाडले ,मोबाईल काढून घेतला . या सर्व प्रकारामुळे सतीश काळे हे अत्यंत मानसिक तणावात असून त्यांच्यासहित त्यांचे कुटुंब गणेश बिरादार यांच्या दहशती मुळे दबावाखाली आले आहे. या दडपणामुळे त्यांच्या जीविताचे काहीही बरे वाईट होऊ शकते. हा सर्व अतिशय गंभीर प्रकार असून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्याकडून झालेला आहे. त्यामुळे नक्की त्याना कायद्याचे ज्ञान आहे का असा प्रश्न पडला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यासोबतची अशी वागवणूक हि अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे फौजदार दंड संहिता च्या अनेक गंभीर स्वरूपाच्या कलमांचे उल्लंघन सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्याकडून झालेले आहे. तसेच भारतीय राज्यघटनेने नागरिकास दिलेल्या स्वातंत्र्याच्या हक्कांवर व सन्मानाने जगण्याच्या मूलभूत मानवी हक्कांवर गदा आणण्याचे गंभीर कृत्य या पोलीस अधिकाऱ्याकडून झाले असल्याने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून त्याना तात्काळ बडतर्फ करावे .सदर प्रकारांची चौकशी निष्पक्ष व पारदर्शक व्हावी यासाठी त्या अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवावे. सर्व घटनेची नोंद संबंधित अधिकाऱ्याच्या सर्व्हिस रेकॉर्डवर घेण्यात यावी. अशी विनंती अपना वतन संघटनेच्या वतीने आपणाकडे करीत आहोत. सदर बाबतीत ८ दिवसांमध्ये योग्य ती कारवाई अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्याची सर्व जबाबदारी राज्य सरकार व पोलीस यंत्रणेची राहील असे आवाहन अपना वतन संघटनेने केले आहे.

Related posts

कसला सांगली पॅटर्न हा तर भाजपा चा पिंपरी चिंचवड पॅटर्न, नितीन लांडगे यांनी स्थायी समितीच्या सभापती निवड

PC News

महाविकास आघाडी सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले – पिंपरी-चिंचवड भाजपकडून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध

PC News

“पिंपरी चिंचवड मनपा ने व्यवसाय सूरु करण्याच्या परवानगीच्या नावा खाली सरू केलेली करवसुली थांबवावी” – आमदार अण्णा बनसोडे

PC News

शहरातील मधुमेही रुग्णांना लसीकरण मध्ये प्राधान्य द्यावे:दिपक मोढवे पाटील

PC News

शहरात प्रथमच सेंद्रिय शेतमाल, पालेभाज्या थेट दारात उपलब्ध – पिंपरी चिंचवड महिला बचत गटाचा उपक्रम

PC News

…. तर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

PC News

एक टिप्पणी द्या