January 23, 2022
पिंपरी चिंचवड

‘५ कोटी द्या, नरेंद्र मोदींची हत्या करतो’

पाँडिचेरीमध्ये मोठी खळबळ उडाली होती. एका ४३ वर्षांच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्य़ाचा प्रस्ताव दिला होता. जर त्याला कोणी 5 कोटी रुपये देत असेल तर तो मोदींची हत्या करेल, असा प्रस्ताव त्याने पोस्ट केला. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

आर्यनकुप्पम गावातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला गुरुवारी अटक करण्यात आली. नंतर त्याला स्थानिक न्यायालयात सादर करण्यात आले.

न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी रिअल इस्टेट एजंट आहे. त्याचे नाव सत्यानंदम आहे. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यानंदमने त्याच्या फेसबुक वॉलवर एक मेसेज लिहिला होता. गुरुवारी हा मेसेज एका कार चालकाने पाहिला आणि पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी पाहिल्याने कार चालकाने लगेचच पोलिसांना याची माहिती दिली.

Related posts

पिंपरी विधानसभा संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी संगीता जोशी यांची दुसऱ्यांदा निवड, आ.आण्णा बनसोडे यांचे हस्ते दिले नियुक्तीपत्र!!!

PC News

पोलिस फ्रेंडस वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १३ हजार रुपयांची मदत

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप

PC News

पुणे जिल्ह्यात कोरोनाव्हायरसचे 174 रुग्ण आढळले, 14 मृत्यू

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 16 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

PC News

कोविड -19: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील परिस्थितीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा

PC News

एक टिप्पणी द्या