June 24, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

बाणेर-बालेवाडी सारखेच विकसीत होणार हे गांव, गुंतवणूकदारांची होणार चांदी!

पुणे : १२ फेब्रुवारी २०२१

गेल्या 1 दशकात पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे विकास वेगाने वाढले आहे. आयटी हब म्हणून ओळखला जाणारा पुणे शहर आज महाराष्ट्रातील सर्वात मोठा शहर म्हणून ओळखला जातो (हद्दीत).

पुणे, पिंपरी चिंचवड शहराचा विकास केवळ एकाच भागात होत नसून चारी दिशेने होत आहे, उत्तरेकडे चिखली, मोशी, चाकणचा भाग आहे, तर दक्षिणेला कात्रज, कोंढवा, उंडरी हे भाग वेगाने विकसित होत आहेत. वाघोली, केसनंद हे पूर्वीकडे आहेत आणि पश्चिमेकडे वाकड, बाणेर, सुस, हिंजवडी, रावेत हे भाग वेगाने विकसित होत आहेत.

नुकतेच नवीन गावांचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश झाल्याने गुंतवणूकदारांना नव्याने संधी दिसू लागली आहे.

 कोणत्या गांवचे होणार बाणेर-बालेवाडी सारखे विकास ?

हिंजवडी लगत असलेले म्हाळुंगे गांवाकडे सर्वांचे लक्ष आहे, 2018 साली मान- म्हाळुंगे हायटेक सिटीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

म्हाळुंगे हे हिंजवडीलगत असल्याने तसेच पुणे महानगरपालिका हद्दीत म्हाळुंगेचा समावेश झाल्याने नागरिकांच्या चकरा म्हाळुंगेकडे वाढलेले दिसून येत आहे.

तसेच म्हाळुंगे कडून हिंजवडीला जोडणारा 60 मीटरचा  पूल देखील तयार झालेला आहे, या पुलामुळे हिंजवडीला एक नवीन प्रवेशद्वार मिळाले आहे.

(Image : Actual Photo of the bridge)

इतकेच नव्हे तर म्हाळुंगे मध्ये नावाजलेले बिल्डर ‘गोदरेज’, कुमार प्रॉपर्टीज, व्ही टी पी अशे बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध कंपन्यांनी अगोदरच उडी घेतली असून त्यांचे देखील काम वेगाने सूरु आहे.

म्हाळुंगे येथे अनेक नियोजित असलेल्या रस्त्यांचे काम पुणे महानगरपालिका करत आहे व कामाची गती वाढलेली दिसून येत आहे यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये म्हाळुंगेचा विकास बाणेर बालेवाडी सारखाच होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

Related posts

देहू येथे मोफत सॅनिटायजर स्टँडचे आयोजन

PC News

अक्षय चव्हाण युवामंच आयोजित कोरोना जनजागृती अभियान

PC News

धक्कादायक: भोसरी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप

PC News

कसला सांगली पॅटर्न हा तर भाजपा चा पिंपरी चिंचवड पॅटर्न, नितीन लांडगे यांनी स्थायी समितीच्या सभापती निवड

PC News

राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे

PC News

एक टिप्पणी द्या