January 23, 2022
पिंपरी चिंचवड राजकारण

कामगार नेते शिवाजी खटकाळे यांचा सत्कार करण्याची संधी म्हणजे निषठेचा सन्मान करणे होय – राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे प्रतिपादन

देहू : प्रतिनिधी

प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल श्री शिवजीराव खटकाळे (भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व कामगार प्रतिनिधी मेळावा संत कृपा मंगल कार्यालय देहुगाव येथे राज्यमंत्री तथा सोलापुर जिल्हाचे पालकमंत्री मा. ना. श्री दत्तात्रय भरणे (मामा) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजक श्री योगेश जाधव (उपाध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल), श्री प्रकाश हगवणे (देहु शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी प्रास्ताविक करुन भाऊंना पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा. ना. श्री दत्तात्रय भरणे (मामा) यांनी खटकाळे भाऊंच्या कामाचे कौतुक करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी श्री किशोर ढोकळे साहेब अध्यक्ष राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, श्री सोमनाथ आप्पा शिंदे सहसचिव महा. प्र. रा. काँ. कामगार सेल, श्री राजेंद्र कोंडे (अध्यक्ष पुणे शहर कामगार सेल), श्री किरण देशमुख (अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर कामगार सेल), उमेश महाराज मोरे इनामदार, उद्योजक विशाल परदेशी, श्री दत्तात्रय येळवंडे, श्री प्रविण बल्लाळ (पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल), IMD कामगार समन्वय संघटना वालचंदनगर चे युनियन पदाधिकारी, प्रशांत बेंडभर, अमित घेणंद तसेेेच महिंद्रा कंपनीचे संदीप गार्डे, विजय फिरके, बाप्पुसाहेब मुसुडगे, शैलेश चव्हाण, माणिक जाधव, राहुल साळुंके आणि बहुसंख्य कामगार बांधव त्याचप्रमाणे विविध कंपन्या मधील कामगार प्रतिनिधी तसेच सेल चे शहर जिल्हा कामगार सेल पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी भाऊंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी योगेश जाधव यांनी स्मार्ट हेल्थ कार्ड, कामगारांना परवडणारी घरे आणि नव्याने सुरवात होणाऱ्या कामगारांसाठीच्या हेल्पलाईन ची माहिती सविस्तर विषद केली.
कोरोना व कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार मिळालेल्याचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस चे ज़िल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर परंडवाल यांनी सर्वांचे आभार मानले.

Related posts

पुणे जिल्ह्यात कोरोनाव्हायरसचे 174 रुग्ण आढळले, 14 मृत्यू

PC News

राष्ट्रवादीने एनडीए सोबत यावं – रामदास आठवले

PC News

पुणे,पिंपरी चिंचवड पश्चिम महाराष्ट्र सोशल फाऊंडेशन ची स्थापना, सभासद होण्याचे आवाहन:रणजित औटी,(अध्यक्ष)

PC News

प्रभाग१७ मध्ये रेंगाळलेली विकास कामे सुरू, नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार

PC News

आनंददायी बातमी : पिंपरी चिंचवड मधील ७ बालकांना …………

PC News

दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे आंदोलन!!!:विनोद कांबळे(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सामजिक न्याय विभाग)

PC News

एक टिप्पणी द्या