January 23, 2022
गुन्हा पिंपरी चिंचवड

आळंदी : दगडाने ठेचून एकाचा खून

आळंदी : प्रतिनिधी

देवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील बाजूला इंद्रायणी नदीच्या काठावर एकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका पुजाऱ्याने आळंदी पोलिसात फिर्याद दिली आहे.

खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्याचे वय सुमारे 30 ते 35 वर्ष आहे. धीरज संजय कुबेर (वय 30, रा. आळंदी) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीच्या घाटावर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मागील बाजूला अज्ञातांनी एका व्यक्तीच्या डोक्यात दगडाने मारून त्याचा खून केला.

मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता फिर्यादी कुबेर पूजेसाठी घाटावर गेले असता अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

मनसे वाहतूक सेनेच्या वतीने मोशी येथे रिक्षा चालकांना ऑनलाइन फॉर्म सुविधा :सुनील कदम,मनसे

PC News

मोशी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष रोपांचे वाटप:सुनिल कदम, मनसे वाहतूक सेना

PC News

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

PC News

पश्चिम महाराष्ट्र सोशल फाऊंडेशनसाठी अहोरात्र मदतीचे दिले आश्वासन,सभासद नोंदणी जोरात सुरू !!! : राहुल कलाटे (मा.गटनेते शिवसेना,नगरसेवक)

PC News

पावसाळ्यापूर्वी होणार शहरातील रस्ते दुरुस्ती,नाले,ड्रेनेज सफाईचे काम,आयुक्तांनी दिले आदेश,दिपक मोढवे यांनी केली होती मागणी!!!

PC News

SKF कंपनी समोर उद्या शितल शिंदे यांच्या पुढाकाराने भाजीपाला विक्री केंद्राचे आयोजन

PC News

एक टिप्पणी द्या