January 23, 2022
गुन्हा पिंपरी चिंचवड

अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला भोसरीत अटक

भोसरी : सचिन कांबळे (PC News)

आज रोजी भोसरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार गणेश हिंगे व गणेश सावंत यांना गुप्त बतमीदारांमार्फत माहिती मिळाली की रोझरी स्कुल, पुणे नाशिक हायवे भोसरी येथे तडीपार इसम नामे रमजान मशाक कुरणे रा. मोरेवस्ती चिखली, पुणे हा येणार आहे. सदर बातमीची खात्री करून सहा. पोलीस निरीक्षक सिद्धेशवर कैलासे, भोसरी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, यांनी श्री आवताडे सो.मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो.भोसरी पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री जितेंद्र कदम, भोसरी पोलीस स्टेशन यांना कळविले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सिद्धेशवर कैलासे व तपास पथकातील अंमलदार हे मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी गेले. आरोपी दिसून येताच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला ताब्यात घेण्यात आले.

सदर कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. कृष्ण प्रकाश, मा.अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१, श्री मंचक इप्पर, सहा.पोलीस आयुक्त डॉ.सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.कदम यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री.सिद्धेशवर कैलासे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, गणेश सावंत, संतोष महाडिक, विनोद वीर यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली.

Related posts

नगरसेवक विलास मडिगेरी पुढील उपचारासाठी बिर्ला हॉस्पिटल मध्ये दाखल

PC News

पिंपरी चिंचवड आयुक्तांची बदली ? राजकीय वर्तुळात चर्चा

PC News

नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत २२कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी नगरमधून ३डॉक्टर अटक,पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेची चमकदार कामगिरी!!!

PC News

अक्षय चव्हाण युवामंच आयोजित कोरोना जनजागृती अभियान

PC News

वाल्हेकरवाडी,शिवनगरी,गुरुद्वारा, बिजलीनगर परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!!!:ज्योती भालके(अध्यक्षा, जिजाऊ महिला मंच)

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप

PC News

एक टिप्पणी द्या