June 24, 2021
गुन्हा महाराष्ट्र व्यापार

साताऱ्यात तयार झाले पेट्रोलचे विहीर, वाचा संपूर्ण प्रकरण

सातारा : पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असून सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच सातारा जिल्ह्यात पेट्रोल चोरीची एक घटना घडली आहे. फलटण येथील पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं.

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं भगदाड पाडलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.

मात्र पाइपलाइन फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाहून गेलं.

लाखो रुपयांचं हजारो लिटर पेट्रोल जमिनीत मुरल्यामुळे या भागातील विहिरी पेट्रोलनी भरल्या आहेत. तसंच जमिनीत मुरलेल्या प्रेट्रोलमुळे अनेक एकर शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालं आहे. विहिरीतील मासे आणि बेडूक, तसंच परिसरातील साप मृत झाल्याचं दिसून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या भागातील लोकांनी शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे

Related posts

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता

PC News

बालेवाडी : भरधाव वाहनाच्या धडकेत एका तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू

PC News

पुण्यात ड्रग्स विक्री करणाऱ्या महिलेस अटक

PC News

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता

PC News

उर्वरित भागातील ‘सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू करा – ‘आप’ युवा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

PC News

संदीप पवार यांच्या कडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला१लाख ५१हजारांचे योगदान,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धनादेश सुपूर्त!!!

PC News

एक टिप्पणी द्या