June 24, 2021
जीवनशैली दुनिया

“Before we were our Bodies” या विषयावर श्री. शंतनु जोशी ह्यांचे वेबिनार 

दिनांक ७ मार्च २०२१,

रविवार रोजी फॉग लॅम्प मिशन सेशन्स तर्फे Before we were our Bodies या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक व्यक्तिमधल्या जीवन चेतनेवर होणारे संस्कार व शरीर-मन-जीवन चेतना ह्यांच्या समन्वयाबद्दल Life Purpose Strategist- श्री. शंतनु जोशी (SJ) यांनी मार्गदर्शन केले. 

 

आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास इतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होतेअसे सांगत SJ ह्यांनी वेबिनारची सुरुवात केली. २ तासांच्या या सत्रामध्ये जीवन चेतनेचा स्रोत, तिचा प्रवास आणि आपण आपल्या जीवन चेतनेवर कसे संस्कार करू शकतो हे त्यांनी उदाहरणांच्या मदतीने सोप्या भाषेत समजावले.

प्रश्नोत्तरांच्या सत्राने शंकानिरसन झाले असे उपस्थितांनी नोंदवले. मिळालेले ज्ञान लगेच उपयोगात आणण्यासाठी वेबिनारच्या शेवटी  SJ ह्यांनी एक ध्यानप्रकार शिकवला. १४ वर्षांच्या शालेय मुलांपासून ते ७० वर्षाच्या वृद्ध व्यक्तींपर्यन्त अनेकांनी वेबिनारला उपस्थिती लावली. 

 

Related posts

मकरसंक्रांती निमित्त मनसे तर्फे पतंग वाटपाचा उपक्रम

PC News

महेंद्र सिंग धोनी यांचे पिंपरी-चिंचवड मधील घर आहे कोठे, हे वाचा

PC News

असा ‘देश’ जेथे केवळ महिलाच राज्य करतात, पुरुषांकडे नागरिकत्वही नसते

PC News

12 ऑक्टोबर पासून धावणार पुणे – लोणावळा लोकल

PC News

प्रियकराच्या घरी पोहचली प्रेयसी आणि म्हणाली, ‘माझी संपूर्ण संपत्ती घे, पण…’

PC News

उपवास या विषयावर श्री शंतनु जोशी यांचे मार्गदर्शन

PC News

एक टिप्पणी द्या