December 8, 2021
आरोग्य जीवनशैली पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

पुण्यात 28 एप्रिलनंतर रुग्णसंख्या झपाट्याने घसरणीला (डाउन ट्रेंड) लागेल.

पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख गेल्या आठ दिवसांमध्ये सतत उंचावण्याऐवजी आता बर्‍यापैकी सरळ रेषेत (फ्लॅट) आला आहे. सध्या पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण मिळून 10 हजारांच्या आसपास रुग्णसंख्या दिसून येत आहे. मात्र, 15 मेपर्यंत पुण्यात दिवसाला केवळ हजार ते दोन हजार रुग्ण आढळतील, असे पुणेकरांसाठी दिलासादायक असलेले अनुमान सार्वजनिक आरोग्य खात्यातील वरिष्ठ तज्ज्ञांनी काढले आहे.

पुण्यात सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. एका दिवशी दहा हजारांच्या आसपास नवीन रुग्ण आढळून येतात आणि त्यापैकी चार ते पाच टक्के रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची गरज पडते.

मात्र, ते मिळत नसल्याने सध्या पुण्यात 100 च्या आसपास मृत्यू होतात, तर 10 ते 15 रुग्णांचा मृत्यू रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही बेड न मिळाल्याने होतो. अशा नकारात्मक वातावरणात रुग्णसंख्या झपाट्याने कमी होणार ही सकारात्मक आणि दिलासादायक बातमी पुणेकरांचा जीव भांड्यात टाकणारी आहे.

कोरोनाची पहिली व दुसरी लाट कधी आली, कोणत्या भागात ती कधी सुरू झाली, त्यामध्ये पुणे, महाराष्ट्र आणि भारत यांचे स्थान काय आहे यानुसार दुसरी लाट कधी ओसरेल हे अनुमान व्यक्‍त केले आहे. संसर्ग रोगाच्या अभ्यासानुसार कोरोनाची लाट जितकी वेगाने येते तितक्याच वेगाने कमी देखील होते. सध्याची ही दुसरी लाट आहे. ती जितक्या झपाट्याने वाढली तितक्याच झपाट्याने कमी होईल, अशी माहिती पुणे आरोग्य परिमंडळाचे सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. एसबीआयच्या इन्व्हेस्टमेंट डिव्हिजननेदेखील असेच अनुमान याआधी व्यक्‍त केलेले आहे, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

तिसर्‍या लाटेची तीव्रता लसीकरणावर अवलंबून

कोरोनाची तिसरी लाट साधारणपणे ऑगस्टमध्ये येईल आणि दिवसाळीपर्यंत चालेल. पण तिची तीव—ता कमी असेल. लसीकरण कसे होते यावर तिसर्‍या लाटेचा परिणाम अवलंबून राहील. दुसरी लाट सुरू होईपर्यंत आपल्याकडे दोन ते तीन टक्के लसीकरण झाले होते. पण तिसरी लाट सुरू होईपर्यंत आपल्याकडे 18 ते 45 वयोगटातील बाहेर पडणार्‍या लोकसंख्येचे जर 20 टक्के लसीकरण झाले तरी बर्‍यापैकी तिसरी लाट नियंत्रणात असेल, असे अनुमान आरोग्य खात्याने व्यक्‍त केले आहे

Related posts

रायगडावर डिस्कोथेक सारखे वातावरण तयार करणे अपमानजनक : छत्रपती संभाजीराजे

PC News

पुणे जिल्ह्यात कोरोनाव्हायरसचे 174 रुग्ण आढळले, 14 मृत्यू

PC News

धक्कादायक घटना : बेड न मिळाल्याने ४१ वर्षीय महिलेची आत्महत्या

PC News

एकनाथ खडसे यांच्या गाडीचा अपघात

PC News

सर्वसामान्य नागरिकांना 12 तास पेट्रोल मिळणार

PC News

भाजपा मधील माळी समाजाचे ओबीसी नेते खडसे समर्थक अनिल महाजन यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश.

PC News

एक टिप्पणी द्या