September 20, 2021
इतर पिंपरी चिंचवड

कोयते दाखवून चिंचवड मध्ये अडीच हजारांची लूट

चिंचवड:प्रतिनिधी

चिंचवड येथील मोरया नगर मधील तिघांनी मिळून एका भंगार दुकानदाराला ‘हप्ता का दिला नाही’ असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवला. तसेच त्याच्या दुकानातून जबरदस्तीने अडीच हजारांची रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान आरोपींनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. ही घटना मंगळवारी दुपारी मोरयानगर, चिंचवड येथे घडली.

यासीम याकुब शेख (वय २४, रा. मोरया नगर चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अण्णा हजारे रा. वेताळ नगर चिंचवड अमित उर्फ गोट्या अण्णा जाधव महादु वाघमारे राहणार लींक रोड चिंचवड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आम्ही तिचा भाऊ याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भंगारचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. हप्ता का दिला नाही या कारणावरून आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील अडीच हजार रुपये बळजबरीने चोरून नेले.अनेक वेळा येथील भंगार व्यवसायिक यांच्याकडे भुरटे चोर भंगार विकण्यासाठी येत असतात.

आरोपींनी जाताना दुकानाजवळ जमा झालेल्या लोकांना मोठमोठ्याने शिवीगाळ करून हातातील कोयते नाचवत जर कोणी पुढे आले तर तोडून टाकेल अशी धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

रहाटणी फाट्यावर ड्रेनेज चेंबर बनले वाहन चालकांसाठी धोकादायक!!!!

PC News

उद्योगनगर मधून लोकमान्य हॉस्पिटल कडे जाणारा मार्ग बनला धोकादायक,खड्डे दुरुस्तीची मागणी!!!

PC News

उन्नति सोशल फाउंडेशन तर्फे कार्यालय ते लसीकरण केंद्र जाणे व येण्याचे मोफत सुविधा

PC News

महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी,विक्री पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाप्पू गायकवाड, काळूराम कवितके यांचे पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाला निवेदन,लवकरच मागण्या मान्य करण्याचे अतुल आदे यांनी दिले आश्वासन!!!

PC News

बनावट फेसबुक अकाऊंट बनवून सम्राट मोजे यांची बदनामी

PC News

चापेकर चौकात ७०हजारांची दारू जप्त, सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई!!!

PC News

एक टिप्पणी द्या