July 26, 2021
गुन्हा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

स्पर्श हॉस्पिटलच्या कारवाईमुळे व्हाईट कॉलर राजकारणी,डॉक्टर पोलिसांच्या रडारवर!!!


चिंचवड:मनोज शिंदे
काही दिवसांपूर्वी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मध्ये महापालिकेचे ठेकेदार पध्दतीने चालणारे स्पर्श हॉस्पिटल च्या कोव्हिडं सेंटर मध्ये डॉक्टरांनी रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी १लाख रुपये घेऊन केलेला भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे महापालिकेने डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून स्पर्श हॉस्पिटल चा ठेका रद्द केला. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी महापालिकेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे पत्र दिले आणि आता महापालिकेतील व्हाईट कॉलर असलेले नेते रडार आलेले आहेत.
यामुळे आता महापालिकेचा मोठा भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बाहेर काढून कारवाईची टांगती तलवार या व्हाईट कॉलर असलेल्या नेत्यांवर आली आहे.
पोलीस चौकशी मध्ये अनेक राजकीय आणि मोठ्या डॉक्टरांनी बेडसाठी हस्तक्षेप करून आर्थिक भ्रष्टाचार करून रुग्णांच्या टाळू वरचे लोणी खाणाऱ्यांची नावे उघड झाली असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळेच पोलीस आयुक्तांनी
कारवाई करण्यासाठी चे पत्र महापालिका प्रशासनाला दिले.
असे पत्र बहुदा पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पहिल्यादा पाठवले असावे अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
कारण जेव्हा पासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त या ठिकाणी रुजू झाले त्या दिवसापासून त्यांनी शहरातील नागरिकांसमोर कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हा करणाऱ्या वर कडक कारवाई करत असल्याचे चित्र दिसून येते.
काल पुन्हा स्पर्श हॉस्पिटल च्या कर्मचाऱ्यांनी रेमदेसीविर इंजेक्शन चा काळाबाजार करताना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे या स्पर्श कोव्हिडं हॉस्पिटल साठी कोणतेही रुग्ण उपचारासाठी दाखल नसताना ५कोटी चे बिल अदा केले गेले.
यामध्ये कोणाचे हात ओले झाले असतील ते देवाला माहीत मात्र पिंपरी चिंचवड च्या करदात्यांच्या नशिबी अजूनही त्यांची राजकीय नेते आणि अधिकारी मिळून लूट करत हे सिद्ध झाले आहे असेच म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी पुढाकार घेऊन या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली.मागील वर्षी देखील स्पर्श हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.काही राजकीय पक्षांनी मास्क खरेदी, रुग्णांना चादर खरेदी,कोव्हिडं च्या रुग्णांना लागणारे साहित्य असो या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बाहेर काढलेला शहराने पाहिला आहे पण त्यांच्यावर कारवाई संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येते.
पण आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी थेट या कोरोना काळातील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यामध्ये सामील असणाऱ्या राजकीय नेते, डॉक्टर यांची नावे लवकरात लवकर जाहीर करून त्यांच्यावर कडक कारवाई करणार का? हे लवकरच पिंपरी चिंचवड करांना दिसून येणार आहे.

Related posts

उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे पोलिसांना कोरोना योद्धा सन्मान

PC News

लहानग्या वेद खेडकरला शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचे मदतीचे आवाहन !!!: शेखर चिंचवडे, (अध्यक्ष)

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 16 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

PC News

भाजप महिला मोर्च्याच्या मागणीला यश,महापालिकेने केले १८ते४४लसीकरण ५ ठिकाणी केंद्र सुरू:उज्वला गावडे

PC News

तळेगावत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला

PC News

पिंपरी चिंचवड मध्ये अजून ६ रुग्ण आढळले

PC News

एक टिप्पणी द्या