September 20, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड

चिंचवड च्या राजाचा लोक कलावंतांना मदतीचा हात!!!

चिंचवड:प्रतिनिधी
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
वरील म्हणीप्रमाणे चिंचवड चा राजा मंडळ नेहमीच समाजातील लोकांसाठी आपले कर्तव्य समजून मदत करत आलेले आहे
कोरोनाच्या या वैश्विक महामारी मध्ये लाॅकडाऊनमुळे अनेक जनांचे रोजगार गेले.
यातीलच एक वर्ग म्हणजे कलाकार वर्ग गेले १८महिने या लोककलावंतांच्या हातात काम नाही.
या सर्व परिस्थितीचा विचार करून अक्षय तृतीया व छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ व सत्संग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कानिफनाथ मठाधिपती प.पु.पुंडलिक गरुड महाराज, नगरसेवक संदीप आण्णा कस्पटे व नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या हस्ते या कलाकार वर्गास अन्नधान्याचे किट देण्यात आले.
सदर उपक्रमाचे आयोजन सत्संग फाऊंडेशनचे राजेश शिरोळे व राजेंद्र मांडवकर व मंडळाचे महेश मिरजकर, अविनाश तिकोने, योगेश चिंचवडे, महेश लांडगे, दुर्गेश मिरजकर, अमर गावडे, निखिल भालके, धनंजय शाळीग्राम, तेजस खेडकर, योगेश मिरजकर, योगेश देशमुख ,रोहित गावडे, प्रशांत आगज्ञान, आदित्य मिरजकर, साहिल मिरजकर इ. कार्यकर्त्यांनी केले.

Related posts

कसला सांगली पॅटर्न हा तर भाजपा चा पिंपरी चिंचवड पॅटर्न, नितीन लांडगे यांनी स्थायी समितीच्या सभापती निवड

PC News

कोरोनाच्या नावाखाली खरेदीत वस्तूंमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची कधी करणार आयुक्त चौकशी? मा.आमदार विलास लांडे यांची मागणी

PC News

(कोव्हिड१९) लहान मुलांच्या सुरक्षेसाठी भाजप महिला मोर्चाचे डिजिटल मार्गदर्शन:उज्वला गावडे

PC News

महेंद्र सिंह धोनी नंतर आता एकता कपूर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन

PC News

पिंपरी येथे बॉम्ब सापडल्याने उडाली खळबळ

PC News

महापालिकेच्या मालकीच्या व्यायाम शाळेवरून महापालिकेचे नाव झाले गायब,आयुक्तांनी नाव टाकण्याचे तातडीने द्यावे आदेश:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

एक टिप्पणी द्या