July 26, 2021
भारत महाराष्ट्र

Red Alert : पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार

मुंबई:  पी.सी. न्यूज

15 आणि 16 मे म्हणजेच शनिवार, रविवार दरम्यान प्रचंड वेगाने येणारे तौक्‍ते चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. लक्षद्वीप बेटांचा भाग आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे येऊ घातलेले चक्रीवादळ मंगळवारपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल. कोकणच्या किनारपट्टीवर 15 ते 17 मेदरम्यान मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांसह पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, या वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल (ता.१५) विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. अरबी समुद्रातील ताउक्‍ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सूचना प्रशासनास दिल्या. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असे, त्यांनी सांगितले.

पुढील चोवीस तासांत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा यामार्गे 18 मेपर्यंत हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. चक्रीवादळ काळात राज्याच्या किनारपट्टीवर 15 ते 17 मेदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. काही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल.या काळात दोन्ही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी तालुक्यातील सागरी किना-यावरील व आसपासच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, वीज गायब होऊन अंधाराचा सामना करावा लागू शकतो.

चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून, तुटून पडण्याची शक्यता लक्षात घेऊन घराजवळची झाडे तत्काळ तोडण्याचा सल्‍ला देण्यात आला आहे. संकटकाळात उपयोगी पडेल असे कोरडे व खराब न होणारे खाद्यपदार्थ तयार करून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. लहान मुले, वृद्ध व्यक्तींसाठी लागणारा विशेष आहारदेखील तयार ठेवण्याच्या सूचना आहेत.

Related posts

व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही – छ.उदयनराजे भोसले

PC News

संदीप पवार यांच्या कडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला१लाख ५१हजारांचे योगदान,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धनादेश सुपूर्त!!!

PC News

नवीन ग्राहक संरक्षण कायदा आजपासून देशभरात लागू, ग्राहकांसाठी नव्या कायद्यात काय असणार सुविधा ?

PC News

पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ मधील शासकीय कार्यालयात बोगस आरटीआय कार्यकर्त्यांचा सुळसुळाट,बोगसगिरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय,पोलीसांना कारवाईची मागणी!!!

PC News

पंकज बगाडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार आघाडी हवेली तालुका अध्यक्षपदी निवड

PC News

प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

PC News

एक टिप्पणी द्या