September 20, 2021
इतर पिंपरी चिंचवड

मनसे वाहतूक सेनेच्या वतीने मोशी येथे रिक्षा चालकांना ऑनलाइन फॉर्म सुविधा :सुनील कदम,मनसे


चिंचवड:प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालकांना ऑनलाईन फॉर्म भरत असताना अडचण येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना मोशी येथे मोफत फॉर्म भरून देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तरी रिक्षा चालकांनी सुनील कदम (उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पिंपरी चिंचवड शहर मोशी) यांच्याशी संपर्क साधून फॉर्म भरण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करून सरकारी अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने रिक्षाचालक आणि मालक यांना दीड हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यासाठी रिक्षाचालक व मालक यांनी ऑनलाईन फॉर्म भरून देणे गरजेचे आहे. परंतु लॉकडाऊन सुरू असल्याने रिक्षा चालकांना ऑनलाईन फॉर्म भरत असताना अडचणी येत असल्याने सुनील कदम यांनी मोशी येथे मोफत फॉर्म भरण्याची व्यवस्था केली आहे तरी या परिसरातील रिक्षा चालकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे प्रतिनिधी सागर चव्हाण, शरद चव्हाण, अतिश चव्हाण, प्रतिक चव्हाण, सागर चव्हाण, अक्षय चव्हाण व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी राजु जन्मलीला , अरविंद बाड, अंबादास जाधव,अजय गंधे, उपस्थित होते …
अनुदानचा फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे
आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर
आधार कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स,
गाडी नंबर,
सर्व कागदपत्रे व्हॉट्स ॲप करू देखील करू शकता
किंवा खालील पत्त्यावर संपर्क साधून सुनील कदम (उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, मोशी)
मो.९६०४८१३३०४
मु.पो मोशी (देहुरस्ता सिध्देश्वर नगर ) कार्यालयात जमा करावे.

Related posts

महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा,उपक्रमाचे कौतुक,अनेक मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

PC News

उन्नति सोशल फाउंडेशन चा पूरग्रस्तांना मदतीचा हात, अध्यक्षा कुंदा भिसे यांची नागरिकांना आवाहन

PC News

महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी,विक्री पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाप्पू गायकवाड, काळूराम कवितके यांचे पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाला निवेदन,लवकरच मागण्या मान्य करण्याचे अतुल आदे यांनी दिले आश्वासन!!!

PC News

चिंचवडमध्ये नागरिक काटेकोरपणे पाळत आहेत लॉकडाऊन

PC News

फॉग लॅम्प मिशन सेशन तर्फे “लॉकडाऊन टू नॉक डॉन” या विषयावर वेबिनार आयोजित

PC News

अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा लोकार्पण

PC News

एक टिप्पणी द्या