January 23, 2022
इतर पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

आकुर्डी मध्ये जनसेवा प्रतिष्ठान तर्फे १महिन्यापासून मोफत अन्नदान:मंदार कुलकर्णी, जनसेवा प्रतिष्ठान

आकुर्डी:प्रतिनिधी
आकुर्डी येथील चिंतामणी गणपती मंदिरात जनसेवा प्रतिष्ठान तर्फे गेल्या महिना भरापासून गरजूंना मोफत अन्नदानाचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठान चे अध्यक्ष मंदार कुलकर्णी यांनी केले होते.
जनसेवा प्रतिष्ठान तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य,पूरग्रस्तांना मदत, आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सध्या कोरोनाच्या काळात अनेक रस्त्यावरची गरीब लहान मुले आणि त्यांची कुटुंबातील सदस्य उपाशीपोटी राहू नये हे ध्येय समोर ठेवून आम्ही ही सेवा करीत आहेत.
विशेष म्हणजे यामध्ये अनेक मित्र परिवाराचे सहकार्य लाभले त्यामुळे आम्ही महिन्या भरापासून अन्नदान सुरू ठेवले आहे असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष मंदार कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी, शंभू पाटील,ईश्वर पोखरणा,प्रकाश गायकवाड, रवी रिक्कल, रवींद्र घाडीघावकर, दत्तू जाधव आणि परिसरातील जेष्ठ नागरिक अन्नदान करण्यासाठी उपस्थित होते.

Related posts

अक्षय चव्हाण युवा मंच आयोजित आदर्श विवाह सोहळा

PC News

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून 94 कोटी लुटणाऱ्यास अटक

PC News

व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही – छ.उदयनराजे भोसले

PC News

पुण्यात २१ वर्षीय तरुणाचा कोरोनाची लक्षणं दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू

PC News

अमिताभ बच्चन कोरोना पॉसिटीव्ह – नानावटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट

PC News

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार, आरोपीस अटक

PC News

एक टिप्पणी द्या