June 24, 2021
आरोग्य जीवनशैली पिंपरी चिंचवड राजकारण

माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या जन्मदिनी कार्यकर्त्यांना केली आपुलकीची विनंती

प्रतिनिधी :भोसरी

आज 1 जून रोजी भोसरीचे प्रथम आमदार म्हणून ओळखले जाणारे विलास लांडे यांचे वाढदिवस आहे.

कोरोनाचे संकट हे आपल्या शहरात आजही कायम आहे आणि संपूर्ण राज्यात कठोर निर्बंध आहेत, तसेच या कोरोना काळात अनेक जवळच्या लोकांचे मृत्यू देखील झालेले असताना विलास लांडे म्हणतात, ‘अशा संकट काळात वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नाही, आपणही जाहीरपणे साजरा करू नये व भेटण्यासाठी कोणीही येऊ नये अशी विनंती करतो’.

विलास लांडे यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडिया द्वारे कळवले आहे की माझ्यावर प्रेम असेल तर खलीलपैकी एकही काम करून त्याचे फोटो अथवा व्हिडिओ त्यांना पाठवावे आणि तीच सर्वात मोठी शुभेच्छा असेल असे त्यांनी सांगितले.

काय आहेत हे काम ?

1. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना शैक्षणिक व आर्थिक मदत करण्याचे त्यांनी योजिले आहे, तुम्ही पण करावी.

2. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना ते मदत करणार आहेत, तुम्हीही करावी.

3. केसकर्तनालय कारागिरांना ते मोफत किट वाटप करणार आहेत, तुम्ही आपल्या जवळपासच्या कारागिरांना मदत करावी

 

Related posts

संदीप पवार यांच्या कडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला१लाख ५१हजारांचे योगदान,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धनादेश सुपूर्त!!!

PC News

राष्ट्रवादी काँग्रेस देहू शहर च्या वतीने महावितरण च्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

PC News

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई करा,सहाय्यक आयुक्त विकास ढाकणे यांना दिले निवेदन!!!: विनोद कांबळे(अध्यक्ष:सामाजिक न्याय विभाग,राष्ट्रवादी काँग्रेस))

PC News

पावसाळ्यापूर्वी होणार शहरातील रस्ते दुरुस्ती,नाले,ड्रेनेज सफाईचे काम,आयुक्तांनी दिले आदेश,दिपक मोढवे यांनी केली होती मागणी!!!

PC News

अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला भोसरीत अटक

PC News

थंडीत वाढणार कोरोनाचा प्रकोप – WHO चा इशारा

PC News

एक टिप्पणी द्या