June 24, 2021
खेळ पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र

पिंपरी चिंचवडचे केशव अरगडे यांची जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून प्रशिक्षक म्हणून निवड

नुकत्याच जागतिक बुद्धिबळ संघटनेने दि. २१मे ते २३ मे २०२१ दरम्यान प्रशिक्षकांची तयारी आणि शालेय प्रशिक्षक पदवी या विषयांवर ऑनलाईन सेमिनार व पदवी परिक्षा घेण्यात आली.

या सेमिनार साठी जगभरातील ३० जणांची निवड त्यांच्या रेझ्युमे नुसार करण्यात आली.
या संपूर्ण सेमिनार मध्ये ४ वय वर्षे ते १२ वय वर्षांच्या मुलांसाठी बुद्धिबळाचा अभ्यासक्रम कसा असावा, शालेय अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा कसा समावेश होऊ शकतो, इतर विषयांचा अभ्यास करताना बुद्धिबळाचा वापर करुन विषय सोपा कसा करता येईल, गणित, इतिहास, विज्ञान यामध्ये ज्या पाया घडविण्यासाठी बाबी आवश्यक असतात उदा. अंकगणित, आकलन, विश्लेषण, निर्मिती ह्या सर्व बाबी अगदी लहान वयात बुद्धिबळ खेळता खेळता नकळत कशा मुलांमध्ये रुजतील, यासाठी छोटे छोटे बुद्धिबळाचेच करमणूकात्मक पूरक खेळ, कोडी, गोष्टी इ. बाबी व त्यांचे वर्गवार नियोजन कसे करायचे ह्याचे सेमिनार मध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

यासाठी जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या शैक्षणिक बुद्धिबळ विभागाचे सेक्रेटरी आदरणीय केवीन सर, बाल मानसोपचार तज्ञ तमारा मॅडम, शालेय बुद्धिबळ प्रशिक्षक रेकॉर्डो यांचे मार्गदर्शन लाभले.

यामध्ये साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल चे क्रिडा शिक्षक केशव प्रभाकर अरगडे यांनी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले. ही परीक्षा बुद्धिबळामधील अवघड समजली जाते यामध्ये १०० पैकी ६५ टक्के पास होण्यासाठी लागतात. केशव अरगडे यांनी या परीक्षेत ७०टक्के गुण मिळवून परिक्षा उत्तीर्ण झाले.

यासाठी त्यांना साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका आरती पाटील मॅडम व स्कूल मॅनेजर सुधाकर विश्वनाथ सर यांचे मौलिक सहकार्य लाभले. या यशासाठी केशव अरगडे यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
तसेच पिंपरी चिंचवड क्रिडा व शारीरिक शिक्षण महासंघाच्या वतीने कौतुक करण्यात आले.

Related posts

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या तर्फे मास्क, सॅनिटायझर व पी.पी.ई. किटचे वाटप

PC News

लोणावळा, खडकवासला, ताम्हिणी येथे कडक बंदोबस्त, पर्यटकांवर होणार कारवाई

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 16 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

PC News

पुनावळे येथील घनकचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध: राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

वयाने 27 वर्ष लहान असलेल्या सुंदर अभिनेत्री सोबत लग्न करणारे ‘ते’ मुख्यमंत्री कोण आहेत ?, पहा फोटो…

PC News

उन्नति सोशल फाउंडेशन तर्फे कार्यालय ते लसीकरण केंद्र जाणे व येण्याचे मोफत सुविधा

PC News

एक टिप्पणी द्या