June 24, 2021
पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र व्यापार

क्रिप्टोकरंसी (Cryptocurrency)व्यवहारांवर बंदी नाही – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

दिल्ली : दि. ०१ जून २०२१

अनेक महिन्यांपासून भारतात क्रिप्टोकरंसी (cryptocurrency) व्यवहारांवर बंदी होणार की काय या विषयी चर्चा रंगल्या होत्या.

क्रिप्टोकरंसीच्या व्यवहारांवर बंदी व्हावी यासाठी काही आर्थिक सल्लागारांनी सुचवले होते मात्र क्रिप्टोकरंसी मध्ये नागरिकांना जास्त रुची आहे असे सर्वत्र दिसून आले आणि नागरिकांनी #indiaagainstcryptoban ही हॅशटॅग मोहीम सर्वत्र चालवली.

केंद्र सरकारने या मोहिमेला सकारात्मक उत्तर देत आम्ही यावर नक्की विचार करू अशी भूमिका मांडली.

काही प्रायव्हेट बँकांनी क्रिप्टोकरंसी मध्ये गुंतवणूक अथवा व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना क्रिप्टोकरंसी व्यवहारात धोका होऊ शकतो आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जबाबदारीवर व्यवहार करावे , तसेेच क्रिप्टोकरंसी  (Cryptocurrency ) वर बंदी होणार असे सुचवले

मात्र आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून अशी कोणतीही सूचना दिलेली नाही असे स्पष्ट करण्यात आले आणि कोणत्याच प्रकारची बंदी यावर नाही असेही एका सर्क्युलर द्वारे कळवले

प्रायव्हेट बँकांनी क्रिप्टोकरंसी

मध्ये व्यवहार करणाऱ्या ग्राहकांचे KYC करून घेणे आवश्यक आहे असेही आरबीआय कडून सुचवण्यात आले.

या मुळे क्रिप्टोकरंसी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाची लहर आहे.

Related posts

विद्या बालन देणार 1000 पीपीई किट

PC News

अक्षय चव्हाण सोशल फाऊंडेशन तर्फे मिठाई वाटपाचा उपक्रम

PC News

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून 94 कोटी लुटणाऱ्यास अटक

PC News

पिंपरी चिंचवडचे आयुक्त बनले सर्व पक्षाचे कृत्रिम हार्डवैरी,विरोध केला नाही की विकास कामे सुरू!!!

PC News

साताऱ्यात तयार झाले पेट्रोलचे विहीर, वाचा संपूर्ण प्रकरण

PC News

आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुणे दौरा

PC News

एक टिप्पणी द्या