June 24, 2021
जीवनशैली पिंपरी चिंचवड राजकारण

वाढदिवसाचे निमित्त साधत कुणाल वाव्हळकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

पिंपरी : प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या हाताला काम नाही. अशा नागरिकांना दोन वेळेच्या जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने कोविड 19 सारख्या साथीच्या आजारामुळे अनेक गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवसानिमित परिसरात साफसफाई चे काम करणारे सफाई कामगारांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला तसेच परिसरातील गोरगरीब गरजू लोकांना दहा किलो धान्य ,कांदे,बटाटे ,चहा पावडर,साखर व सॅनिटायझर अश्या किट चे वाटप केले.

वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा ,पार्टी न करता गरिबांच्या तोंडात अन्नाचा एक घास देण्याचा उपक्रम कुणाल वाव्हाळकर यांनी आज चिंचवड मधील वाकड परिसरातील स्वतःच्या ऑफिस समोरील परिसरात केला.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत ,शहर भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर ,कामगार नेते विनोद चांदमारे, योद्धा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष साकी गायकवाड, युवा नेते अभिमान कलाटे, युवा नेते गौतम सोनवणे ,राजेश बोबडे, योगेश भोसले, किरण समिंदर, सुजित कांबळे ,अविनाश शिरसाट, अंतिम जाधव,दिगंबर भंडारी, विशाल शिंदे, सुरज वाघमारे हे उपस्थित होते.

Related posts

वयाने 27 वर्ष लहान असलेल्या सुंदर अभिनेत्री सोबत लग्न करणारे ‘ते’ मुख्यमंत्री कोण आहेत ?, पहा फोटो…

PC News

कोयते दाखवून चिंचवड मध्ये अडीच हजारांची लूट

PC News

अभिनेते विक्रम गोखले यांना होणार अटक ?

PC News

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध:उज्वला गावडे

PC News

या मुलीनं आत्महत्या केली तर त्याला राष्ट्रवादीचा नेता जबाबदार- तृप्ती देसाई

PC News

आर पी आय (निकाळजे गट)अमित मेश्राम यांचा काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश!!!

PC News

एक टिप्पणी द्या