June 24, 2021
गुन्हा पिंपरी चिंचवड व्यापार

चापेकर चौकात ७०हजारांची दारू जप्त, सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई!!!

चिंचवड:प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने चिंचवड परिसरात कारवाई करून ७० हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी चापेकर चौक चिंचवड येथे करण्यात आली.

दीपक काळुराम बागडे (वय २४ रा. डायमंड टेलर्स जवळ, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव, सांगवी),आणि प्रथमेश वाईन्सचे मालक (वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चापेकर चौक चिंचवड येथून अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी कारमधून दारू वाहून नेली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.

  • सध्या चिंचवड पोलीस स्टेशन च्या हद्दीत वाल्हेकरवाडी रोड पासून रावेत चौक पर्यंत आणि बिजलीनगर येथील रहिवासी परिसरामध्ये हॉटेल मध्ये बेकायदेशीर पणे दारू विक्री केली जाते असे दिसून येत आहे सामाजिक सुरक्षा पथकाने अशा ठिकाणी कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे.

यावेळी पोलिसांनी ७०हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि ५ लाख १० हजार रुपये किमतीची एक स्कॉर्पिओ चार जप्त केली आहे. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related posts

शहिद दिनानिमित्त केशव अरगडे यांची सायकलवारी गडकोटांवरी मोहीमेची श्री क्षेत्र राजगुरूनगरला भेट, अनेकांनी केली मोहिमेची कौतुक

PC News

१ एप्रिल पासून स्टॅम्प ड्युटी वाढणार ?

PC News

ब्रँडेड कुंकू न वापरल्याने लग्न मोडलं

PC News

भाजप महिला मोर्चा च्या वतीने घारे शास्त्री सभागृहात योग शिबिराचे आयोजन:उज्वला गावडे (भाजप महिला मोर्चा)

PC News

शहरातील मधुमेही रुग्णांना लसीकरण मध्ये प्राधान्य द्यावे:दिपक मोढवे पाटील

PC News

आता पिंपरी चिंचवड महापालिका करणार झोपडपट्टी मधील नागरिकांना आर्थिक मदत

PC News

एक टिप्पणी द्या