June 24, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

संदीप पवार यांच्या कडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला१लाख ५१हजारांचे योगदान,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धनादेश सुपूर्त!!!

चिंचवड:प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी युवा नेते संदीप पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नवीन पक्ष कार्यालयासाठी १,५१,०००/- रुपयांचे भरघोस योगदान दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आज हा धनादेश सुपूर्त केला.

संदीप पवार यांनी पण त्यांचे मी आभार मानले व एकीच्या बळातून निर्माण होणारे पक्षकार्यालय निश्चितच सर्व कार्यकर्त्यांना समान न्याय देणारे असेल असा विश्वास त्यांना देण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला.

ताथवडे गावचे तथा मुळशी तालुक्यातील राजकीय वर्चस्व असलेले कै.रमण नाना पवार तर माजी नगरसेविका यमुना ताई पवार ते चिरंजीव संदीप पवार आहेत.

सध्या नव्या राजकीय समीकरण जुळवून पाहिले तर संदीप पवार युवा पिढीला बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे म्हणूनच पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी संदीप पवार यांचे नाव आघाडीवर असल्याने ही भेट घेतली असल्याचे दिसून आले.

Related posts

वाकड पोलीस गुन्हेगारांसाठी ऍक्शन मोडमध्ये,१३गाड्या फोडणाऱ्यांची वाकड परिसरात काढली धिंड!!!

PC News

MH-14 च्या वाहनांना सोमाटणे – लोणावळा येथील टोलवर सूट

PC News

पुण्यात २१ वर्षीय तरुणाचा कोरोनाची लक्षणं दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू

PC News

भाजप सरकारने 68607 कोटीचे कर्ज माफ केले, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे

PC News

न्यूजपेपर मध्ये खाद्यपदार्थ घेण्यास टाळावे, आरोग्यास होऊ शकते हानी

PC News

धक्कादायक घटना : बेड न मिळाल्याने ४१ वर्षीय महिलेची आत्महत्या

PC News

एक टिप्पणी द्या