December 8, 2021
इतर जीवनशैली पिंपरी चिंचवड

राहण्यासाठी रावेत पेक्षा वाकड बरे – नागरिकांची प्रतिक्रिया

चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास ३० लाखांपर्यंत पोहचली आहे. आयटी क्षेत्राशी जोडलेले असल्याने आणि नवी मुंबईशी द्रुतगती मार्गाने जोडलेले असल्याने पिंपरी चिंचवड शहरात मुंबईकरच नव्हे तर अनेक ठिकाणाहून नागरिक स्थलांतरित होऊन पिंपरी चिंचवडकडे आकर्षित होत आहे.

पिंपरी चिंचवड शहर म्हणजे उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते, गेल्या अनेक वर्षात पिंपरी चिंचवड शहरातुन काही मोठ्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी पलायन केले मात्र यावर आयटी कंपन्यांनी ही कमी भरून काढली. आयटी क्षेत्र पिंपरी चिंचवड हद्दीच्या बाहेर जरी असला तरी मात्र तेथे काम करणारा वर्ग पिंपरी चिंचवड मध्येच राहण्यास पसंत करतो हे तितकेच खरे.

रावेत पेक्षा वाकड बरे, असे का ?

गेल्या शनिवारी घर विकत घेणाऱ्या काही नागरिकांशी संवाद केला असता त्यांना विचारण्यात आले की आपण पिंपरी चिंचवड मध्ये आपलं घर रावेत अथवा वाकड यापैकी कोणत्या भागात घेण्यास प्राधान्य देणार, तर २० पैकी १३ नागरिकांनी वाकड परिसरात घेणार असे सांगितले मात्र रावेत साठी ७ लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

कारण विचारले असता त्यांनी सांगितले की रावेत मध्ये आवश्यक असलेले सुविधा सध्या कमी आहेत आणि ते तयार होत आहेत परंतु वाकड सुसज्ज आहे आणि सर्व सुविधा सध्या उपलब्ध आहेत कुठल्याही मूलभूत सुविधांसाठी अंतर गाठावं लागत नाही.

रावेत परिसरात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि मूळ राहणारे कमी आहेत, मात्र वाकड येथे मूळ राहणारे जास्त आहेत.

आपल्या कामाच्या ठिकाणाहून कमीत कमी अंतरावर आपले घर असावे असे मत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी मांडला.

तसेच येत्या काळात आयटी कंपन्यांची संख्या वाढणार आहे ज्यामुळे वाकड पूर्णपणे भरून जाणार आणि नागरिकांची हिंजवडीलगत गावांमध्ये म्हणजेच पुनावळे, ताथवडेसह रावेतकडेही अधिक वाटचाल सुरू होणार यात शंका नाही.

Related posts

“आदि-शक्ती मेडिटेशन” ने झाली नवरात्राची मंगलमय सुरवात 

PC News

निराधारांना दिली पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन ने मायेची उब !

PC News

पिंपरी चिंचवड मधील ऑनर किलिंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया

PC News

अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा लोकार्पण

PC News

निगडी- प्राधिकरणातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचा पाठपुरावा

PC News

शनिदेवाचे कोरोनाच्या लाटेमुळे २५ कोटींचे नुकसान!!!

PC News

एक टिप्पणी द्या