January 23, 2022
इतर जीवनशैली महाराष्ट्र

शिवराजाभिषेक सोहळा निमित्ताने नुकतेच ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, इतिहास अभ्यासकांनी सांगितले महत्व

चिंचवड : प्रतिनिधी

‘हे गडकोट आपली पंढरी’ या व्हॉट्सअॅप ग्रुप तर्फे ह्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यान मालेत श्री क्षेत्र जुन्नर येथील इतिहास अभ्यासक आणि शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संघटनेचे विश्वस्त आदरणीय श्री विनायक खोत सर आणि महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आदरणीय श्री आप्पा परब यांच्या कन्या इतिहास अभ्यासक सौ. शिल्पाताई परब- प्रधान यांनी व्याख्यान दिले.

श्री खोत सरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री क्षेत्र जुन्नर या विषयावर व्याख्यान देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीचा इतिहास, जुन्नर परिसर, येथील गडकोट, लेण्या यांविषयी माहिती सांगितली. तसेच दादरच्या इतिहास अभ्यासक सौ. शिल्पाताई परब- प्रधान यांनी राजाभिषेक या विषयावर व्याख्यान देताना राज्याभिषेक न म्हणता राजाभिषेक म्हणायला हवे हे अतिशय समर्पक पणे पटवून दिले, तसेच राजाभिषेक का केला, राजाभिषेकाची पाश्वभूमी, राजाभिषेक श्री क्षेत्र रायगडावरच का केला, राजाभिषेक सोहळ्याचे मार्मिक वर्णन, तसेच दोन्ही व्याख्यात्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांची ही उत्तरे दिली.

 

त्यात राजाभिषेका संदर्भातील ज्या अख्यायिका आहेत त्या संदर्भात खूप चांगल्याप्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले तसेच महाराजांच्या जीवन प्रसंगावर बऱ्याच आख्यायिका आहेत त्याबाबतीत ही दोन्ही व्याख्यान कर्त्यांनी मार्मिक उत्तरे दिली.

तसेच जुन्नर मधील गडकोटांची तसेच राजगड व रायगड या गडकोटांचीही माहिती यावेळी दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे गडकोट आपली पंढरी या ग्रुपमधील केशव प्रभाकर अरगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली केशव अरगडे यांनी केले.

Related posts

चक्रीवादळातील पीडीतांना उन्नतीचा मदतीचा हात

PC News

श्री. शंतनु जोशी सरांनी घेतले “7.5” या विषयावर शिबिर 

PC News

बोपखेल (रामनगर-गणेशनगर) भागात माझ्या मुस्लिम बांधवाना दफनभुमी साठी जागा मिळावी- भाग्यदेव घुले

PC News

धक्कादायक : राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 260 जणांचा मृत्यू

PC News

पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शरीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे “ गाथा महाराष्ट्राच्या ऑलिंपिक वीरांची” या कार्यक्रमाचे आयोजन, केशव अरगडे यांची क्रीडा समितीमध्ये निवड

PC News

उद्धव ठाकरे यांना दिलासा, राज्यपाल कोश्यारी यांनी ९ परिषदांच्या जागेवर मतदान जाहीर करण्याची केली विनंती

PC News

एक टिप्पणी द्या