June 24, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी पुन्हा होणार 2% ?

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या 3 महिन्यांमध्ये रियल इस्टेट मार्केट मध्ये गति खालावली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यालाही याचा परिणाम दिसून आलेला आहे.

कडक निर्बंध असल्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना बाहेर पडता आले नाही आणि बिल्डर कडून वर्चुअल टूर करून खरेदी करण्यास नागरिकांची पसंती नसल्याचे दिसून आले. घर घेणे हे स्वप्न असतं म्हणून प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय घेता येत नसल्याने याचा नुकसान बिल्डरांना सोसावा लागला.

यासाठी अनेक रियल इस्टेट संघटनेंनी राज्य सरकारला स्टॅम्प ड्युटी मध्ये गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील पुन्हा कपात करण्यात यावा अशी पत्राद्वारे मागणी केली आहे.

सध्या ५% असलेल्या स्टॅम्प ड्युटीला २% करावे, व मार्च २०२२ पर्यंत मुदत द्यावे, असे त्या निवेदनात उल्लेख आहे. स्टॅम्प ड्युटी मध्ये कपात झाल्यास घर घेणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मात्र यावर राज्य सरकारने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, तरी काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Related posts

‘रेमडेसिवीर’ खरेदी करा, अन्यथा महापालिकेस टाळे लावू – विशाल वाकडकर

PC News

शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करा:दिपक मोढवे

PC News

बाणेर-बालेवाडी सारखेच विकसीत होणार हे गांव, गुंतवणूकदारांची होणार चांदी!

PC News

चिंचवड मधील विनापरवाना भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई कधी?

PC News

पुणे कॅम्प येथील मासळी बाजार मध्ये लागली भीषण आग

PC News

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

PC News

एक टिप्पणी द्या